ऑनरचा बेस्टसेलर स्मार्टफोन ऑनर 7एक्स आता ऑफलाइन उपलब्ध
ऑनर या हुवेईच्या डिजिटल बदलांसाठी असलेल्या ई-ब्रॅण्डने आज घोषणा केली की त्यांच्या सर्वोधिक विक्री होणार्या स्मार्टफोन्सपैकी एक ऑनर 7एक्स 464जीबी व्हेरिएण्ट आता 15,999 रुपये किमतीमध्ये ऑफलाइन बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणार आहे. ऑफलाइन किंमत ऑनलाइन किमतीप्रमाणेच आहे.
ऑनरने नुकतीच फ्लेक्ससोबतच्या सहयोगाने चेन्नईजवळील श्रीपेरंबुदुर येथील फ्लेक्सच्या केंद्रामध्ये ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत ऑनर 7एक्सच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याची घोषणा केली. ऑफलाइन बाजारपेठेसाठी ऑनरने काळा व निळा अशा दोन रंगांमध्ये 464जीबी व्हेरिएण्ट सादर केले आहे. या ‘मेड इन इंडिया’ डिवाईससोबत ट्रॅव्हेल चार्जर, डेटा केबल, टीपीयू केस, इजेक्टर पिन, वॉरण्टी कार्ड व युजर मॅन्युअल ही अॅक्सेसरीज येतात. ऑनरने आपली सेवा क्षमता वाढवण्यासोबतच ग्राहकांना विक्री-पश्चात्त सर्वोत्तम सेवा देण्यासाठी भारतभरातील सर्विस सेंटर्सच्या संख्यांमध्ये वाढ केली आहे. ऑनर 7एक्स 12 महिन्यांची स्टँडर्ड वॉरण्टी, बॅटरी व चार्जर अॅडप्टरवर 6 महिन्यांची वॉरण्टी आणि चार्जर/डेटा केबलवर 3 महिन्यांच्या वॉरण्टीसह उपलब्ध असेल.
हुवेई कन्झुमर बिझनेस ग्रुपच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष पी. संजीव म्हणाले, ‘‘ऑनर 7एक्स ने वाजवी दरात सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त आणि सर्वोत्तम फोटोग्राफीचा आनंद देणार्या स्मार्टफोनच्या संदर्भात उत्तम बेंचमार्क स्थापित केला आहे. आम्हाला घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की ग्राहकांना आता आमचा सुपरस्टार स्मार्टफोन त्यांच्या जवळच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध असणार आहे आणि त्यांना वाजवरी दरातील ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची सर्वोत्तम सुविधा मिळणार आहे. ऑनर 7एक्स 9 फेब्रुवारीपासून भारतभरातील ऑनरचे अधिकृत स्टोअर्स व विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल.’’
ऑनर 7एक्स हा वाजवी दरामध्ये सर्वोत्तम सुविधा देणारा उत्तम डिवाईस ठरला आहे. या सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेल्या स्मार्टफोनमध्ये आकर्षक रचना आणि 5.9 इंचाची स्क्रिन आहे. या स्मार्टफोनमधून आकर्षक व्हिज्युअल अनुभव मिळण्यासोबतच नयनरम्य फोटो काढता येतात. ऑनर 7एक्स मध्ये ड्युअल लेन्स 16 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे, ज्यामध्ये फेज डिटेक्शन ऑटोफोकस व एलईडी फ्लॅश आहे. या हायब्रिड ड्युअल-सिम हँडसेटमध्ये ऑक्टा-कोअर हायसिलिकॉन किरिन 659 चिपसेटसह 4 जीबी रॅम आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 3340 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नोगट-आधारित ईएमयूआय 5.1 कस्टम स्किनवर चालतो.
