आयडियातर्फे नोकिया फिचर फोन्सवर 600 रुपयांची कॅशबॅक ऑफर

Share this News:

आयडिया सेल्युलर या भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या कंपनीने ग्रामीण भारतात मोठ्या संख्येने असलेल्या 2 जी ग्राहकांसाठी नोकिया फिचर फोन्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. नोकिया 105, नोकिया 130 आणि नोकिया150 हे फिचर फोन्स विकत घेणार्या सर्व आयडिया ग्राहकांना खरेदीनंतरच्या 12 महिन्यांच्या कालावधीत600 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.

28 दिवसांसाठी वैध असणार्या 50 रुपयांचा टॉक टाईम दरमहा कॅशबॅक स्वरुपात मिळण्याकरिता आयडिया ग्राहकांना दरमहा एकूण 100 रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक आहे. 12 महिन्यांच्या कालावधीत एकूण600 रुपयांचा कॅशबॅक मिळवून यातून टप्प्याटप्प्याने 2जी ग्राहकांच्या डिव्हाईसचा खर्च भरून निघणार आहे. 31 जुलै 2018 पर्यंत उपलब्ध असलेली ही ऑफर सर्व जुन्या व नवीन ग्राहकांसाठी मान्य आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आयडिया सेल्युलरचे वरीष्ठ विपणन अधिकारी श्री. शशी शंकर म्हणाले,भारतातील वाढत चाललेल्या ब्रॉडबॅण्डच्या वापरावर आयडियाने लक्ष केंद्रित केले असून आमच्या मोठ्या संख्याबळाच्या 2 जी ग्राहकांच्या तसेच, भारताच्या ग्रामीण भागातील कनेक्टेड नसलेले ग्राहकांच्या गरजांबाबतही आम्ही जागरुक आहोत. नोकिया फिचर फोन्सवर देण्यात येणार्या कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून, आम्ही ग्राहकांना किफायतशीरता आणि सहज उपलब्धता या दोन्ही सुविधा देत आहोत.

नोकिया 105 हा फोन 999 रुपयांना उपलब्ध असून नोकिया 130 व नोकिया 150 या कॅमेरासहित फोन्सची किंमत अनुामे 1599 रुपये व 1950 रुपये आहे.नोकियाच्या फिचर फोन्समध्ये एफएम रेडियो,कॅलक्युलेटर, घड्याळ, दिनदर्शिका, रिमाईण्डर्स,फोनबूक आणि फ्लॅशलाईट या फिचर्ससह सक्षम बॅटरी देण्यात येते.