६ जुलै रोजी प्रदर्शित होणार‘सॉरी’
सॉरी हा इंग्रजी शब्द आज सर्वांच्या इतकाअंगवळणी पडलाय की दिवसभरात असंख्य वेळा तोअनाहुतपणे ओठांवर येतो. आजच्या इंग्रजाळलेल्या प्रादेशिकभाषांमध्येही हा शब्द इतका रूळलाय की भविष्यात हा शब्दप्रत्येक प्रादेशिक भाषेतील मूळ शब्दाला मात देईल असंवाटतं. हाच सॉरी शब्द एखाद्याच्या आयुष्यात भिनला कीकाय होतं ते लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणारआहे. वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सॉरी’ हा मराठीसिनेमा ६ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
वायडीजी बॅनरअंतर्गत निर्माते योगेश दत्तात्रयगोसावी यांनी ‘सॉरी’ या चित्रपटाची निर्मिती केली असूनलेखन, दिग्दर्शन आणि संकलन या सिनेमा निर्मितीच्याप्रक्रियेतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. प्रियदर्शना गोसावी या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. ‘सॉरी’ ही एका तरूण नाटयकर्माची कथा आहे. या सिनेमाची कथासौरभ नावाच्या एका तरूणाभोवती गुंफण्यात आली आहे. हातरूण नाटयलेखक आहे. नाटक लिहीता लिहीता त्याच्याजीवनात कशा नाटयमय घटना घडतात याचं चित्रण ‘सॉरी’ यासिनेमात करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सातराज्यांमधील ४५ लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. यातजामा मस्जिद, पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलंप्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर, अमृतसरमधील जगप्रसिद्धसुवर्ण मंदिर या पाच महत्वाच्या विविध धर्मियांच्याप्रार्थनास्थळांचाही समावेश आहे.
निर्माता–दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्यापिढीला डोळयांसमोर ठेवून हा सिनेमा बनवला आहे. आजच्या पिढीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ‘सॉरी’ यासिनेमाबाबत बोलताना गोसावी म्हणाले की, एखादी व्यक्तीकामाच्या आहारी गेली की त्याचे दुष्परिणाम भोगावेचलागतात. याच्या उलटअर्था बोलायचं तर एखादं काममनापासून केलं की ते मनात भिनतं. यातून चांगल्याचीहीनिर्मिती होते आणि वाईटही घडतं. हाच धागा पकडून ‘सॉरी’ या सिनेमाची कथा लिहिण्यात आली आहे. या सिनेमाचातरूण हा आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणारा आहे. मनाचीघालमेल करणारा एक अवघड विषय ‘सॉरी’च्या निमित्तानेरूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याला सर्वप्रकारच्या मनोरंजक मूल्यांची अचूक जोड देण्यात आलीअसल्याने कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकांना हा सिनेमाआवडेल अशी आशाही गोसावी यांनी व्यक्त केली.
हा सिनेमा म्हणजे नवोदित असूनही काहीतरीधडाकेबाज करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या कलाकारतंत्र्ज्ञानाचं टिमवर्क आहे. या सिनेमातील कलाकारही नवोदितअसले तरी प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी लक्षवेधी अभिनयकेला आहे. सौरभ चिरमुल्ला, सुलक्षणा राय, समृद्धी पाचे, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, डॉ. संजीवकुमारपाटील आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. माही कपूर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून दिपीकाअविनाश फत्तेपूरकर लाईन प्रोडयूसर आहेत. चित्रपटातीलगीतांना श्रीरंग ढवळे यांनी संगीत दिलं असून वेशभूषा माहीकपूर यांची आहे. विनोद वाळुंज आणि विजय जोगदंडे यांनीकलादिग्दर्शन केलं असून छायांकनाची जबाबदारी हर्षदमुजुमदार यांनी सांभाळली आहे.
