२ अप्रैल २०१९ : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार , राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुपम बेगी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत म्हेत्रे , मुंबई विभाग अध्यक्ष सचिन कांबळे , विलास मकवानी , कविराज संघेलिया , बलराम लख्खन , बाबूजी बेद , नरोत्तम चव्हाण , दादा गुलजारी चव्हाण , भिकाचंद मेमजादे , तुकाराम चव्हाण , दिनेश देशमुख , सूरज भारवासा , सुमित दरदरे , नरेश राठोड , केशूभाई सोळंकी ,मनोज पटेलिया , चेतन जेधे , महेंद्र लालबिगे ,घनश्याम सुसगोहेर , कैलासकुमार , राजन चंडालिया , सुरेश तामोत , संजय लख्खन , राजेश वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांनी सांगितले कि , अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शरद पवार व बुटा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे . त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार आहे . केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले तर सफाई कर्मचारी आयोग व आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटी पध्दत रद्द करा अशी मागणी करण्यात आली . जातीयवादी सरकारने स्वछता अभियानामध्ये कंत्राटी पध्दत लादण्यात आली . त्यामुळे सफाई कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत . त्यासाठी सफाई कामगारांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे .
या बैठकीत उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत म्हेत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुपम बेगी यांनी केले तर आभार नरोत्तम चव्हाण यांनी मानले .