विसापुर काराग्रहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पळुन गेलेल्या गुन्हेगारास देहुरोड पोलीसांनी केले १२ तासाच्या आत जेरबंद

IMG-20190721-WA0003.jpg
Share this News:

देहूरोड पोलीस स्टेशन गु र नं 35/2011 भा द वि कलम 302,498(अ) 323,504,506 या मधील आरोपी नामे अशोक लक्ष्मण भाग्यवंत वय 23 वर्षे रा ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे , रुपी नगर , तळवडे ता हवेली जि पुणे हा विसापूर कारागृह येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आज दि 21/07/2019 रोजी सकाळी 09:00 वा जेलचे बाहेर संडासला जातो असे सांगून पळून गेला होता सदर बाबत विसापूर कारागृह यांनी देहूरोड पो स्टेला कळविले होते त्याप्रमाणे देहुरोड डी बी पथकाने आरोपी बाबत माहिती काढून त्यास संजय नगर ओटा स्कीम येथे सापळा रचून शितापीने पकडले त्याचेवर बेळवंडी पोलीस स्टेशन गु र नं 223/2019 भा द वि कलम 224 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे त्यास पुढील कारवाई कामी बेलवंडी पोलीस स्टेशन ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांचे ताब्यात देणेची तजवीज ठेवली आहे.

सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त आर के पद्मामनाभन साो,अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे साो,पोलीस उपआयुक्त सुधिर हिरेमठ साो,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रिकांत मोहीते साो देहुरोड विभाग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर साो,पो नि (गुन्हे) गोफने सो यांचे मार्गदर्शना खाली देहूरोड डी बी पथकाचे PSI मनोज पवार PSI गायकवाड ASI सावंत HC सात्रस PN उगले PN जाधव PC परदेशी PC तेलंग PC शेजाळ PC घारे यांनी केली आहे.