पूरग्रस्तांना मदतीबाबत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींसोबत सोमवारी बैठक

Share this News:

पुणे, दि. 16 : पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने सोमवार दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता कौन्सिल हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच संस्था व व्यक्ती स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत असून आणखीही मदत करण्यास उत्सुक आहेत. या सर्वांचे योग्य नियोजन व अमलंबजावणी करणे आवश्यक आहे.

यासाठी होणाऱ्या या बैठकीला दानशूर व्यक्ति, संस्था, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.