Bavdhan residents celebrate third International Yoga Day

Share this News:

 आतंरराष्ट्रीय योग दिवस बावधन येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

        आर्ट ऑफ लिविंग ह्या स्वयंसेवी संस्थेमार्फत शाळा, कॉर्पोरेट ऑफिस, सामाजिक संस्था, मंदिर, हौसिंग सोसायटी अशा विविध ठिकाणी योगशाळेचे आयोजन करण्यात आले आणि योगाभ्यासाचे महत्व पटवून देण्यात आले. बावधन येथे योगदिनाचे औचित्य साधून आर्ट ऑफ लिविंगच्या प्रशिक्षकांनी  ‘हॅप्पी बावधन’ हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आणि त्यांना साथ देण्यास अनेक स्वयंसेवक समोर आले. प्रमोद पुलेसरी, शैलेश ढेकणे,निखिल सोनथालिया,सुभाष बहुलेकर,शिवानी गर्ग,प्रगती देसाई ह्यांनी एकत्र येऊन योगशिक्षण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधला आणि त्यामुळेच ठीकठिकाणी योग वर्गाचे आयोजन व्यवस्थित रित्या होऊ शकले. 

        योगाभ्यासक श्री. शाम रामचंद्रन ह्यांनी स्वयंसेवकांना १२ जून ते १७ जून ह्या काळात अतिशय शिस्तबद्ध रीतीने योग प्रशिक्षण दिले आणि १८ जून पासूनच योग प्रशिक्षण सराव वर्ग सुरु करण्यात आले. आर्ट ऑफ लिविंग च्या २५ ते ३० स्वयंसेवकांनी ह्या सेवा उपक्रमात अत्यंत उत्साहाने आणि उस्फूर्तपणे भाग घेतला. बावधन मधील प्रभात सोसायटी, आदित्य शगुन, डी. एस. के रानवारा, वामन गणेश मंदिर,जिल्हा परिषद शाळा,आमची कॉलनी,अथश्री,विवा हॉलमार्क, एकोने मेडोरी, ड्रीम्स रिदम, ड्रीम्स बेले व्यु, ला वीला कासे अशा १५ पेक्षा अधिक ठिकाणाहून जवळपास १००० लोकांनी योग साधनेत सहभाग घेतला, त्यात ४ वर्षांच्या बालकांपासून ते ८४ वर्षांच्या आजोबा आजींनी ही आनंदाने योग साधना केली.

         आदित्य शगुन मधून योग वर्ग प्रशिक्षण घेतलेल्या सुमेधा देशपांडे म्हणतात,”हा जो विनामूल्य योग वर्ग आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा.” तसेच प्रभात सोसायटी मधून मनीषा बहुलेकर म्हणतात, “ह्या योग वर्गाचा जीवनात नक्कीच फायदा होईल आणि हॅप्पी बावधन मार्फत ज्या हॅप्पीनेस प्रोग्राम चे आयोजन केले आहे, त्याचा जीवनात उपयोग होईल. त्यातील सुदर्शन क्रिया खूप लाभदायी आहे.”

        आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या यशस्वी आयोजनानंतर आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षकांनी व स्वयंसेवकांनी ‘हॅपी बावधन’ हा ९० दिवसांचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. 

        ह्या उपक्रमांतर्गत आर्ट एक्सेल, Yes (येस), हॅप्पीनेस,अंतरज्ञान, श्री श्री योगा,सहज समाधी अशा अनेक कार्यशाळा लहान मुलं, तरुण,गृहिणी,तसेच व्यावसायिक वर्ग अशा विविध वयोगातल्या लोकांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.    

         आर्ट ऑफ लिविंग ह्या संस्थेचा हॅप्पीनेस प्रोग्राम ३० जून ते २ जुलै ह्या तारखेस सायंकाळी ६.०० ते ९.३० ह्या वेळेत पेबल्स-२,बावधन आणि २७ जून ते २ जुलै, सकाळी ५.३० ते ८.३०, राम नगर,बावधन येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच २६ जून ते २८ जून आणि ३० जून ते २ जुलै ह्या तारखेस प्रभात सोसायटी, बावधन येथे आयोजित करण्यात आले आहेत. 

        आध्यात्म,योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून सुखी व स्वास्थ्यपूर्ण आयुष्याकडे वाटचाल करण्यास आयोजित केलेल्या विविध कार्यशाळा अतिशय महत्वपूर्ण ठरतील असा विश्वास आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षकांना व स्वयंसेवकांना आहे.