५० लाखाच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Share this News:

24/8/2019, ुणे :

५० लाख ८५ हजार रुपये जावयाकडून हातउसने घेवून परत न करणे आणि ५ वाहने जावयासाठी घेण्यासाठी जावयाला गाड्यामालकाना पैसे द्यायला लावून त्यातील 2 गाड्या परस्पर स्वताच्या नावावर करून जावयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात फौजदारी दंड संहिता कलम १५६(३) नुसार फिर्यादीचे सासरे आणि पत्नीवर फसवणूक आणि अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती जान्हवी केळकर यांनी २३ ऑगस्ट रोजी दिले आहेत .

या प्रकरणी फेब्रुवारी २०१९ पासून फिर्यादी राहुल जगजिन्नी यांची फिर्याद चतुःशृंगी पोलीस नोंदवून घेत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आणि ३० दिवसात न्यायालयात अहवाल देण्याचा आदेश दिला .

राहुल जगजिन्नी यांचा विवाह समिधा घाटगे यांच्याशी २०09 मध्ये झाल्यानंतर पत्नीच्या संशयी वृत्तीने खटके उडू लागल्यावर ते २०१८ पासून वेगळे राहू लागले . दरम्यान ,त्यांचे सासरे आणि पत्नीला त्यांनी ऑनलाईन व्यवहाराद्वारे ५० लाख दिले .
त्यातील २९ लाख ८५ हजार रक्कम परत दिली नाही. तसेच ५ गाड्या राहुल यांच्या व्यवसाया साठी घेण्यासाठी देखील वेगळ्या रकमा त्यांनी ऑनलाईन व्यवहाराद्वारे गाडीमालकांना द्यायला लावल्या .2 गाड्या सासरे ,पत्नीने गाड्या मात्र स्वतःच्या नावावर करून करून घेण्याचा प्रयत्न केल्याने आणि ताब्यात ठेवल्याने राहुल यांनी कायदेशीर नोटीस पाठवली,तसेच हा फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा कलम दाखल करण्याचा प्रयत्न राहुल यांनी चतुःशृंगी पोलिसात केला . मात्र ,पोलिसांनी तो दाखल करून न घेतल्याने राहुल यांनी न्यायालयात धाव घेतली . न्यायालयाने २३ ऑगस्ट रोजी आदेश दिल्यावर चतुःशृंगी पोलिसानी कलम ४२०,४०६,४६७,४७१ अन्वये गुन्हे दाखल केले .

‘फिर्यादी आणि संबधितांमध्ये नाते संबंध असले तरी पैसे घेतल्याचा आणि परत करण्याची इच्छा नसल्याचे सिद्ध होत असल्याने तसेच गुन्हा दखलपात्र असल्याचे नमूद करत आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत ‘,असे आदेश न्यायालयाने दिले .

या आदेशानंतर २३ ओगस्ट रोजी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सासरे प्रदीप शंकरराव घाटगे यांच्यावर चतुश्रुंगी पोलिसात दाखल झाला आहे . गाड्यांच्या फसवणुकीच्या संदर्भात सासरे प्रदीप शंकरराव घाटगे,राहुलची पत्नी समिधा जगजिन्हि ,संभाजी चव्हाण(एजंट) ,डॉ अजय सावंत (गाडीमालक ) ,पल्लवी श्रीखंडे(गाडीमालक ) ,जितेंद्र गांधी(गाडी मालक ),विनोद खेत्रपाल (गाडी खरेदी विक्री करणारी फर्म ) यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत .

राहुल जगजिन्नी यांच्या वतीने एड . राजेश कातोरे ,एड .अभिजित निमकर यांनी काम पाहिले .