Huge gathering in Ahmednagar to get a glimpse of Sairat fame Rinku Rajguru aka Archie
देवाज् ग्रुपच्या नवरात्रोत्सव मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी रिंकू राजगुरुची उपस्थिती ,अर्चिला पाहण्यासाठी अफाट गर्दी
नगर – येथील देवाज् ग्रुपच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने दुर्गामाताच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी सैराट चित्रपटातील मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) हिला निमंत्रित करण्यात आले होते. प्रोफेसर कॉलनीतील परिसरात हा भव्य दिव्य कार्यक्रम नवरात्राच्या पहिल्या दिवशी रिंकूला डोळे भरुन पहाण्यासाठी तिचे हजारो चाहत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावली.
रिंकूचे आगमन झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिला प्रचंड प्रतिसाद दिला. गोंधळही मोठय़ा प्रमाणात उडाला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरचे नियोजन तर कोलमडून पडले. व्यासपीठावर मान्यवरांची मोठी गर्दी निर्माण झाल्याने सुरक्षा रक्षकांची व पोलिसांची एकच तारांबळ उडून गेली होती. आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते दुर्गामाता देवीची आरती केली. तद्नंतर रिंकू राजगुरु तथा आर्चीला प्रेक्षकांसमोर बोलण्यासाठी माईक देण्यात आला. मात्र, व्यासपीठावरील गर्दी व प्रेक्षकांचा जल्लोषाने गोंधळात मोठी भर पडली. नेमकं काय करावं असाच प्रश्न संयोजकांना पडला होता. रेटारेटी व प्रेक्षकांच्या गोंधळामुळे आर्चीने अवघ्या दोनच मिनिटात आपले मनोगत उरकले.
देवाज् ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक स्वप्निल शिंदे हे सातत्याने प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचे आवाहन करत होते. मात्र, अधून मधून पडणार्या पावसाच्या सरी अन् तरुणांच्या अतिउत्साहामुळे आर्चीच्या उपस्थित झालेला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जावून ३९ दहशतवाद्यांचा खात्मा केली. पाकिस्तानला भारताने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याबद्द्ल जवानांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास अभिनंदन करण्यात आले. भारत माता की जय हो, अशा प्रकारच्या घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात देण्यात आल्या.
देवाज ग्रपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.