Mahesh Landge proved ‘kingmaker’ in Pimpri Chinchwad

Share this News:

आमदार महेश लांडगे ठरले पिंपरी चिंचवड चे ‘किंगमेकर’

– भोसरीत उधळला परिवर्तनाचा भंडारा
– नाथसाहेबांची ‘ती’ शपथ खरी ठरली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे भोसरी विधान सभा मतदार संघाअंतर्गत ४४ जागांपैकी तब्बल ३२ जागा मिळविण्यात भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तनाच्या लढाईत आमदार महेश लांडगे ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गेल्या वर्षभरापासून जोरदार घमासान सुरु होते. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघनिहाय भाजपचे मोर्चेबांधणी केली आहे. भोसरीची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या अगोदर दोनवेळा पैलवान लांडगे यांनी आख्खा मतदार संघ पिंजून काढला. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले आमदार लांडगे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बालेकिल्ल्यात तळ ठोकला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात बफर झोन, कच-यापासून वीज निर्मीती, शास्तीकर, रेडझोनमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, आरक्षित जागांचा विकास, पाणी पुरवठा सक्षमीकरण, नागरी आरोग्य जनजागृती, बेरोजगारी कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेकडो पीडितांना दिलेली मदत असे अनेक विधायक कामे हाती घेवून आमदार लांडगे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा शहर भाजपला झाला आहे. त्यातच भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांशी थेट संपर्क असाणारे आमदार लांडगे म्हणजे भाजपचा चेहरा झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून आमदार लांडगे यांनी घेतलेले कष्ट पाहता पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार आमदार लांडगे ठरले आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरुनही भोसरी भाजपमध्ये मतभेद झालेले पाहायला मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मधील सारंग कामतेकर आणि प्रभाग क्रमांक ३ मधून शैला मोळक यांच्या उमेदवारीला आमदार लांडगे यांचा विरोध होता. निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर या दोन्ही उमेदवारांना पराभव झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी पूर्ण अभ्यास करुनच तिकीटवाटप केले होते. याचा अंदाज भाजप पक्षश्रेष्ठींना आता आला आहे.
—————–
शहरात कमळ फुलले…
शहरात आमदार लांडगे यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर ख-या अर्थाने शहर भाजपला एक आक्रमक चेहरा मिळाला. कॉर्पोरेट राजकारण काय असते? याचे उत्तम उदाहरण आमदार लांडगे यांनी शहराला दाखवून दिले. सर्व उमेदवारांची प्रचार यंत्राणा एकाच छताखाली ठेवून भोसरी भाजपमध्ये एकोपा निर्माण केला होता. त्याला यश मिळाले आणि शहरात कमळ फुलले आहे. त्यामध्ये आमदार लांडगे यांच्या ३२ नगरसेवकांचा समावेश दिसणार आहे.
————————-
नाथसाहेबांची शपथ खरी ठरली…
आमदार महेश लांडगे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या जोरावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. ज्यावेळी लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार अन्य पक्षातील समर्थक उमेदवारांचाही महापालिका निवडणुकीत प्रचार करतील, अशी टीका करण्यात आली. मात्र, मी नाथसाहेबांची शपथ घेवून सांगतो…हा महेश लांडगे फक्त आणि फक्त भाजपच्याच उमेदवारांचा प्रचार करेल…अशी सिंहगर्जना आमदार लांडगे केली होती. आज हाती आलेले निकाल पाहता आमदार लांडगे यांची ती शपथ खरी ठरली, अशी चर्चा भोसरीतील राजकीय वर्तुळात सुरु होती.