MANS misappropriated govt funds – Hindu Janjagruti Samiti

Share this News:

अंनिसने शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याचे प्रकरण 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार वकिलांच्या मार्फत आयुक्तांसमोर उपस्थित

     समाजातील तथाकथित अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांच्या विरोधात कार्य करत असल्याचा दावा करणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’ (नोंदणी क्र.:ई-461) अर्थात् अंनिस ट्रस्टच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेऊन साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’ यांचे विश्‍वस्त असलेले डॉ. शैला दाभोलकर, अविनाश पाटील, प्रतापराव पवार इत्यादींना 8.2.2017 या दिवशी सातारा येथील कार्यालयात उपस्थित रहण्याविषयी नोटीस बजावली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार त्यांचे वकील अधिवक्ता सुकटे यांच्या मार्फत उपस्थित राहिले. या संदर्भात ज्यांनी तक्रार केले ते हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर हेही 8 फेब्रुवारी या दिवशी साहाय्यक धर्मादाय आयुक्त आय.के. सूर्यवंशी यांच्यासमोर उपस्थित होते. श्री. सुनील घनवट यांनी ‘अंनिसच्या घोटाळ्याच्या संदर्भात सातारा येथील धर्मादाय निरीक्षक यांनी जो अहवाल सादर केला आहे, तो अहवाल मिळावा. तो आम्हाला अगोदर समजून घ्यायचा आहे’, अशी मागणी केली. यावर साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सांगितले. तुम्हाला कागदपत्रे देण्यात येतील, तसेच यावरील पुढील सुनावणी 4 मार्च या दिवशी होईल असे साहाय्यक आयुक्तांनी सांगितले. या वेळी श्री. सुनील घनवट यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली.

      अंनिसच्या संदर्भात धर्मादाय निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार आढळून आले आहेत. यांविषयीचा सविस्तर अहवाल धर्मादाय निरीक्षकांनी सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांना सादर केला आहे. शासनाकडे नोंदणी असलेला ‘सार्वजनिक विश्‍वस्त न्यास’ असतांना ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या ठेवीवर शासनाला देय असलेले 2 टक्के अंशदान न देणे (याद्वारे शासनाचे लाखो रुपये बुडवणे), ट्रस्टचा कारभार कायद्यातील तरतूदीनुसार व पारदर्शक नसणे, ट्रस्टमधील निधीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करणे, विदेशी निधी घेण्यासाठीच्या FCRA पावत्यांवर क्रमांक न टाकणे, विदेशातून 10 लाख रुपये निधी घेऊन त्याची वार्षिक हिशेबपत्रात माहिती न देणे, खोटे फेरफार अहवाल तयार करणे, अनेक वर्षे वार्षिक हिशेबपत्रे सादर न करणे आदी अनेक गंभीर स्वरुपाचे गैरव्यवहार व आर्थिक घोटाळे अंनिस ट्रस्टने केल्याचे आरोप आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयानेही ज्या स्वयंसेवी संस्थांची FCRA प्रमाणपत्रे रहित केली होती; त्यात गैरव्यवहार केल्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’चाही समावेश आहे. या प्रकरणी माजी कुलगुरु राम ताकवले आणि शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘वारकरी संप्रदायाचे उर्ध्वयू ह.भ.प. निवृत्त वक्ते महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा हा लढा देत आहोत’, असे राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी सांगितले.