पुणे शहर आणि परीसरात रेल्वे लाईन लगत उघड्यावर शौच

30/8/2019,पुणे:पुणे रेल्वे विभाग रेल्वे स्थानक, रेल्वे गाड्या आणि ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वच्छता सेवा निरंतर पणे सुरू ठेवल्या जातात. परंतु लोकांच्या असहकार्यामुळे घाणीचे प्रमाण खूप वाढत आहेत. पुणे, शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने लोक रेल्वे लाईनवरील मोकळ्या जागेत शौच करतात. त्यांनी महानगरपालिकेतर्फे पुरविलेल्या सुविधांचा वापर करायला हवा पण हे लोक तिथे जात नाहीत आणि स्वच्छ रेल्वे ट्रॅकवरच शौच करतात. त्यांना तेथे स्वच्छता मिळत नाही किंवा तेथे सुविधा अपूर्ण आहेत म्हणून कदाचित ते असे करतात. तसे ही महाराष्ट्रास खुले शौच मुक्त घोषित करण्यात आले आहे. ज्यावर प्रभावी नियंत्रण व पुरेशी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रेल्वे मार्गावर शौचास बसलेले बघीतल्यावर पुणे स्टेशनवरुन ये- जा करणार्या गाड्यांमधून प्रवास करणार्या लोकांच्या मनात होणारी घाणेरडी प्रतिमा पुण्यातील लोकांसाठी नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
लोकांकडून रेल्वेमार्गावर शौच केल्याने रेल्वे कर्मचार्यांना लोहमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामात वाईट आणि घृणास्पद परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले जात आहे जे रेल्वेच्या सुरळीत कामाकरिता आव्हानाच निर्माण करत आहे. ट्रॅकवर लोकांच्या येण्या-जाण्यामुळे तेथील लोहमार्गावर असलेली खडी आणि जमीन विस्कळीत होते जे सिग्नल उपकरणांमधील संपर्कात अडथळा आणते. ट्रॅकवर पडलेल्या घाणीमुळे तेथील वातावरण प्रदूषित होते , तसेच ट्रॅकची देखभाल, नट बोल्ट, रिले यंत्रणांमधे सुध्दा गंज चढून ते ठप्प झाल्याने देखभाली वर त्याचा विपरीत परीणाम होतो.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी नुकतीच सकाळी 06.00 वाजता पुण्याच्या संगम पुलावरून शिवाजी नगर स्थानकापर्यंत पायी चालत जवळून पाहणी केली, ज्यात त्यांना जवळपास असलेल्या वस्तीतील लोक मोठ्या संख्येने रेल्वे मार्गावर उघड्यावर शौच करीत असल्याचे आढळले आणि त्यांनी अशा लोकांविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर लगेचच अशा व्यक्तिंना रोखण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत जी नियमितपणे सकाळी 06.00 ते सकाळी 09.00 या वेळेत संगम ब्रिज, पुणे ते शिवाजी नगर, शिवाजी नगर स्टेशन परीसर , पिंपरी-चिंचवड, आकुर्डी भागात नियमित गस्त घालून अशा व्यक्तिं विरुध्द कारवाई करीत आहेत.
17 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 125जणांना रेल्वे मार्गावर शौच करीत असताना पकडले गेले असून त्यांच्या कडून 42 हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. खुल्यावर शौच करणार्यां विरूद्ध कारवाईची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. अशा व्यक्तींना केवळ दंडच भरावा लागणार नाही तर त्त्यांनी केलेल्या शौचास सुध्दा स्वच्छ करावे लागेल. रेल्वे प्रशासन लोकांना आवाहन करत आहे की उपलब्ध शौचालयांचा वापर करा , रेल्वेमार्गावर शौच करू नका, घाण करु नका. राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) च्या सूचनेनुसार खुल्या वर शौच करणार्या कडून जास्तीत जास्त 5000 रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो.