शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिष्यवृत्ती फॉर्म चे वाटप, करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिना निमित्ताने शिवसेना भोसरी विधानसभा यांच्या वतीने कामगार नेते मा. इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, बांधकाम मजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती फॉर्म चे वाटप व प्रा. विलास वाळके व ॲड. रोहित अकोलकर यांचे करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेना उपनेते पदी माजी खासदार मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड झाल्या बद्दल मावळा पगडी देऊन तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्रक सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मजदुर संघटना व शिवसेना भोसरी विभागाचे श्री. कैलास नेवासकर, श्री.महादेव गव्हाणे, श्री. दिलीप सावंत, श्री. शरद हुले, श्री. अनिल दुराफे, श्री. काळुराम शिंदे, महिला आघाडीच्या सौ. वेदश्रीताई काळे, श्रीमती . स्मिताताई जगदाळे, सौ. नंदाताई दातकर, ॲड.साधनाताई गडसिंग. सौ. उज्वलाताई सावंत, सौ. मनिषाताई परांडे इत्यादीनी केले.