आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा देणा-या व्यवस्थांचे जाळे निर्माण करण्याची गरज – डॉ. जुनेद अहमद
पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अहमद म्हणाले की, आज जागतिक परिस्थिती लक्षात घेत भारत आणि दक्षिण आशियायी देशांना विकासाची मोठी संधी आहे. अमेरिका आणि चीन यांमधील नातेसंबंधांचा विचार केला तर सध्या जी व्यापारी युद्धे चालू आहेत त्यातून भारताला विकासाची संधी आहे. याबरोबरच भारताने मालवाहतूक व्यवस्था व बंदर व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करीत निर्माण क्षेत्रातील संधीचा फायदा उठविला पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच रस्ता आणि शहरांचे व्यवस्थापन यामधील वाढत्या संधीची लक्षणीय आकडेवारी लक्षात घेत भारत विकासाच्या दृष्टीने सिद्ध होऊ शकतो. याशिवाय महिला मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे आज गरजेचे आहे.
आज जगभारातील दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीची तुलना केली तर भारता एवढे दरडोई उत्पन्न असलेली देशात महिला मनुष्यबळाचे प्रमाण हे जास्त दिसून येते. आपल्या देशात महिला मनुष्यबळाला योग्य त्या सुविधा पुरवित त्यांच्या कौशल्यांचा वापर करून घेणे महत्त्वाचे आहे मात्र त्यासाठी समाजाचा महिलांबद्दलचा दृष्टीकोन व्यापक होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे डॉ. जुनैद अहमद यांनी नमूद केले.
