ईव्हीएम मशीनवर ताबोडतोब बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात यावा: तहसिन पुनावाला

Share this News:

पुणे , दि. 23 ( प्रतिनिधी) – राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका दरम्यान ’मतदान यंत्रात (ईव्हीएमफ’) ’फेरफार झाला आहे. दरम्यान त्यासंदर्भात  निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदानाची सर्व आकडेवारी जुळून येत नाही. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रपती कडे धाव घेण्यात येणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर आणि राजकीय विश्लेषक तहसिन पुनावाला यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.  तसेच 25 ’मार्चला ईव्हीएम’ विरोधी कृती समि’तीच्यावतीने शनिवारवाडा ते कॉन्सिल सभागृहपर्यंत ’मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  पत्रकार परिषदेस  दत्ता बहिरट , बाळासाहेब बोडके, रुपाली पाटील, प्रशांत कनोजिया , मयुरी शिंदे आदी उपस्थित होते.

पुनावाला म्हणाले, ’मतदान यंत्रात घोळ झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मीळाले आहे. निवडणुक आयोगाची भाजप हिताची भूमीका सशंयास्पद आहे. याविरोधात ईव्हीए’ कृती सि’तीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे जलीकट्टूला विरोध करण्यासाठी सर्वसामान्य जनतेसह अनेक जण रस्त्यावर उतरले, तसा ईव्हीएम मशीनचा विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या पुढील काळात होणारे मतदान ईव्हीएम मीशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे किंवा मशीनला परस्पर ट्रे जोडलेला असावा अशी मागणी त्यांनी केली.

अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी, मतदान यंत्रात हेराफेरीच्या विरोधात आणि बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी कृती समीतीच्यावतीने  मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम मीशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे, अन्यथा लोकशाही संपुष्टात येईल. ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे यासाठी निवडणुक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. दरम्यान लोकशाहीला बाधक ठरणार्‍या घटनेविरुद्ध तरुणांनी आवाज उठविला पाहिजे. असेही त्यांनी स्पष्ट केले.  आगामी परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पेपर ट्रेल वापरला जावा अशी मागणी निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शनिवारी काढण्यात येणार्‍या  मोर्चाचे नेत्रत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक तेहसीन पुनावाला आहेत, या मोर्चात ईव्हीएम मशीनवर ताबोडतोब बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात यावा, तसेच ज्या शासकीय अधिकार्‍यांनी निवडणुकां दरम्यान चुकीच्या पद्धतीने निर्णय  घेतले.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. बहुसदस्यिय प्रभाग पद्धती रद्द करुन एक सदस्य वार्डस्तरीय निवडणुका घेण्यात याव्यात, अशा  मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चा सकाळी 11 वा शनिवारवाडा येथून निघणार आहे असे दत्ता बहिरट यांनी सांगितले.