कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित घरगुती वकृषी ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

Share this News:

मुंबई, दि. 14 सप्टेंबर 2017 : 31 मार्च 2017 पूर्वी कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडितकरण्यात आलेल्या घरगुती कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीनअभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला मूळ थकबाकीचीरक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीतरक्कमे वरील व्याज विलंब आकार 100% माफ करण्यात येणारआहे.

महावितरणच्या ज्या घरगुती कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा31 मार्च 2017 पूर्वी कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे.अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना असून योजनेत सहभागी होणाऱ्याग्राहकांच्या मूळ थकीत रक्कमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यातयेणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता वीजजोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरु करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या 4 हप्त्यांचाभरणा संबंधित ग्राहकाने मासिक वीज बिल सोबत भरणे आवश्यकआहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्णकेला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रक्कमेवर व्याज विलंबआकारात 100% माफी मिळणार आहे.

कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी घरगुतीग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्याकार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.