के. रहेजा कॉर्पोरेशनचे रहेजा विस्टाज प्रीमियर,  पुणे या व्हॅलेंटाइन्सला प्रेममय होत आहे

Share this News:
पुणे, १० फेब्रुवारी २०१८ : प्रेम व्यक्त करण्यासाठी हिरवळीच्या गालिचावर आणि फुलांच्या सान्निध्यात डिनर करण्यासारखा उत्तम मार्ग नाही. के. रहेजा कॉर्पोरेशन, भारतातील आघाडीचे स्थावर मालमत्ता विकासक, त्यांच्या रसिक ग्राहकांना यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला अशाच परिपूर्ण डिनर डेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. पुण्यातील एनआयबीएममधील रहेजा विस्टाज प्रीमियरच्या आलिशान निवासी संकुलाचा बाह्य परिसर प्रेममय होणार आहे. सूर्यास्त होत असताना हा परिसर मेणबत्त्या, फुले आणि मंद प्रकाशात उजळून निघेल. ११ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या या डिनरमुळे रविवारची संध्याकाळ आनंदात व्यतित करण्याची, वातावरणातल्या गुलाबी भावनांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
ग्राहकांशी नाते जोडण्याचा एक भाग असलेली ही रोमांचक संध्याकाळ रुचकर फिंगरफुड आणि मॉकटेल्सचा आस्वाद घेण्याची आगळावेगळी अनुभूती मिळवून देईल. हिरव्यागार परिसरात भव्य देखावा उभारण्यात येणार असून उद्यानाच्या नैसर्गिक सौंदर्याला साजेशा ताज्या आणि हलक्या फुलक्या पदार्थांचीही त्याला जोड असणार आहे. संगीताशिवाय प्रेम अधुरेच! म्हणूनच रहेजा विस्टाज प्रीमियरच्या पाहुण्यांना कसलेल्या कलाकारांच्या संगीताचे सूर ऐकण्याची संधी मिळेल. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संपूर्ण संध्याकाळ विविध मजेदार खेळ आणि अन्य उपक्रमांतून उपस्थितांचे मनोरंजन करेल.
ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्याशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांना ते किती खास आहेत याची जाणीव करून देण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी समर्पक वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.
प्रकाशयोजना, संगीत, सहभाग आणि मेजवानी सारे काही या विशेष प्रसंगाला साजेसे असणार आहे.
याविषयी के. रहेजा कॉर्पोरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘या उपक्रमातून आम्ही आमच्या ग्राहकांच्या उंबरठ्यावर म्हणजेच त्यांच्या संकुलाच्या हिरवळीवर प्रेम घेऊन आलो आहोत. आम्ही विवध प्रसंग साजरे करून आमच्या ग्राहकांना आनंदात सहभागी करून घेण्याच्या संधी शोधत असतो आणि ही संधी अगदी उत्तम आहे. या माध्यमातून आम्ही के. रहेजा कॉर्पोरेशनच्या प्रगतीच्या प्रवासातील एक भाग झाल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो आणि रहेजा विस्टाज प्रीमियर जे त्यांचे घर आहे, तिथे दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू इच्छितो. ’