तावडे मंडळाच्या युवकांनी समाजाचे कार्यआंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे- शिक्षणमंत्री श्री. विनोदतावडे

WhatsApp-Image-2018-05-10-at-8.22.44-PM2.jpg
Share this News:

मुंबई क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचेकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचेवटवृक्षामध्ये रुपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांचीजिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथीभवन सारखी दिव्यभव्य वास्तू आज दिमाखात उभी राहीली. भविष्यात तावडेमंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्यायुवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या यामंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत राहता या युवामंडळाने आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरनेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन शिक्षणमंत्री श्री. विनोदतावडे यांनी आज केले.

क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून क्षत्रियमराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचेअवचित साधून राजापूर तालुक्यातील आडीवरे गावीनव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पणसोहळा आज शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुखउपस्थितीत शानदारपणे पार पडला. याप्रसंगी खासदारविनायक राऊत,आमदार भास्करराव जाधव, माजी आमदारबाळ माने, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळचे अध्यक्षदिनकर तावडे , सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदारशंकरराव तावडे,उपाध्यक्ष सुहास तावडे, उपाध्यक्ष राजेंद्रतावडे, अतिथी भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडेआदी मान्यवर उपस्थित होते.

त्रिवेणी संगम आणि तावडे समजण्याचा आठशे वर्षाचाइतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजारचौ.फूट.बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजलीइमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोरसुंदर उद्यान सांस्कृतिक सामाजिक केंद्र इत्यादी सुविधाआहेत. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय यावास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे. तसेच यापुढे ही वास्तूसर्वांसाठी मार्केट दराने तर तावडे बंधूंसाठी माफक दारातउपलब्द करून देण्यात येणार आहे असे तावडे हितवर्धकमंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले.

तावडे हितवर्धक मंडळाच्या मार्फत युवकांनी आतापुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे यावे आणि उद्देशाने नवीन उद्योगाजकाना पुढे आणण्यासाठीतावडे मंडळ प्रयत्नशील असेल आपला प्रसार आणिआपले कार्य युवकांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातउमटवावे, अशा शुभेच्छा श्री. तावडे यांनी याप्रसंगीदिल्या.ही वास्तू म्हणजे एक आजच्या युवकांसाठी आदर्शआहे. तावडे कुटुंबियांनीही आपल्या घरातील प्रत्येकशुभकार्य या तावडे अतिथी भवनात साजरा करण्यासाठीजास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच ही वास्तुचा दिमाखदारपणा जास्तीत लोकापर्यंत पोहचिविण्याच्यादृष्टीने या वास्तुचे चांगल्या पध्दतीने मार्केटिंग करुनजास्तीत जास्त लोक या ठिकाणी कसे पोहचतील याचाविचार करावा असेही श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

याप्रसंगी सतीश तावडे यांनी प्रास्तिवक केले. तर खासदारराऊत , आमदार जाधव यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. तर आर्किटेक्ट संतोष तावडे अध्यक्ष दिनकर तावडे यांनीआपले मनोगत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी क्षत्रिय मराठातावडे हितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री.विनोदतावडे यांच्या हस्ते करण्यात आले.