दंत तपासणी शिबीराला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद , एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयातर्फे आयोजन
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी ,उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते .कै. भिकूबाई मेनकुदळे पंचम लिंगायत ट्रस्ट , कस्तुरी चौक ( गणेश पेठ ) येथे रविवार दि. ८ जुलै रोजी हे शिबीर पार पडले . शेकडो वारकऱ्यांनी ,महिलांनी शिबिराचा लाभ घेतला .
दंत तपासणी, औषध वाटप, आणि दंतमंजन -टूथपेस्ट वाटप असे या उपक्रमाचे स्वरूप होते ,अशी माहिती प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख, महाविद्यालयाच्या सार्वजनिक दंत चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका नगराळे यांनी पत्रकाद्वारे दिली.महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स ,विद्यार्थी यांनी वारकऱ्यांना मौखिक आरोग्याचे महत्व समजावून सांगितले .
