दलित पँथरच्यावतीने कोरेगाव पार्कमधील वेस्टीन हॉटेल चौकात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने
दलित पँथरच्यावतीने कोरेगाव पार्कमधील वेस्टीन हॉटेल चौकात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली . दिनांक २४ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ पर्यंत पब , रेस्टोरंट बार आणि डिस्को या हॉटेलांना कायदेशीर रित्या पहाटे पाच वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याबद्दल दलित पँथरच्यावतीने निषेध करून निदर्शने करण्यात आली .
सध्याचे मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडविण्याचा आपल्या सत्तेतून प्रयन्त केला आहेयामुळे तरुणाई व्यसनाधीन होत आहे . त्यामध्ये काल मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल्स कंपाऊंडमधील लागलेली पबच्या आगीमध्ये अनेक जण होरपळून बळी पडले . शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अशा घटना घडत आहे . याची जबाबदारी कोण घेणार ? त्यामुळे दलित पँथरच्यावतीने निदर्शने करण्यात आली , अशी माहिती दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले .
या निदर्शने आंदोलनात दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे ,विक्रम कांबळे , शुभम सोनवणे , प्रविण रणदिवे , पुणे शहर महिला जिल्हाध्यक्षा मुनिरा थानावाला , पद्मावती शिंदे , प्रिन्स थानावाला , राहुल सोनवणे , शुभम शिंदे , रोहित मारणे , वाल्मिक सरतापे , नयन बारटक्के , रविंद्र कांबळे , सुनीता सूर्यवंशी , विलास गायकवाड , नाना गायकवाड , सुरज तुपे , दिव्यांग सोनवणे , सुरज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते . या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे नेते शंकर तडाखे यांनी पाठिंबा दिला .
