देशाच्या विकासात कामगारांचे योगदान : सचिन साठे

Share this News:

पहिल्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी उद्योग उभारणीचा पाया रचला. त्यातूनच 1952 साली पिंपरीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एच ऐ कंपनीचे भूमिपूजन केले. दुर्लक्षित पिंपरी गाव ते मिनी इंडिया समजले जाणारे विकसित स्मार्ट शहर या टप्प्यात येथील कामगारांचे श्रम व योगदान महत्त्वाचे आहेत. काँग्रेसने नेहमीच शेतकरी व कामगार हिताला महत्त्व दिले. इंटक ही कामगार संघटना नेहमीच कामगार कल्याणासाठी प्रयत्न करीत आहे
असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त चिंचवड MIDC येथील 20 गुणवंत कामगारांचा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सदस्य संग्राम तावडे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जयस्वाल, विश्वास दळवी आदी उपस्थित होते. कामगारांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन युवा काँग्रेस सरचिटणीस संदेश बोर्डे यांनी केले. तसेच कुंदन कसबे ,हिरा जाधव, विशाल कसबे ,सिद्धार्थ वानखेडे, पेरणा दळवी, जयश्री दळवी, हनुमंत वाघमारे आदी उपस्थित होते. या वेळी सचिन साठे यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या,