पुणे परिमंडलात 55 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध
पुणे, दि. 2 : पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागासाठी सिंगल फेजचे नवीन 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले असून येत्या तीन ते चार दिवसांत आवश्यकतेनुसार संबंधीत शाखा कार्यालयांपर्यंत पाठविण्यात येणार आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे परिमंडलासाठी एकूण 55 हजार सिंगलफेज नवीन मीटर उपलब्ध झालेले आहेत. त्यातील 15 हजार पुणे ग्रामीण मंडलअंतर्गत तर रास्तापेठ मंडल व गणेशखिंड मंडलअंतर्गत प्रत्येकी 20 हजार वीजमीटर देण्यात येत आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत शाखा कार्यालयांना आवश्यकतेनुसार हे नवीन मीटर वितरीत करण्यात येत आहे.
हे सर्व नवीन वीजमीटर नवीन वीजजोडणी, जुने सदोष वीजमीटर बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात पुणे परिमंडल अंतर्गत 11 हजार नवीन वीजमीटर वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर या महिन्यांत 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले आहेत.
