पुणे विसर्जनाच्या दिवशी वाहतूक बदल :-

Share this News:

एकेरी मार्ग ः- (रविवारी सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत)

१. शिवाजी रोड / लक्ष्मी रोड ः- गाडगीळ पुतळा चौक ते जिजामाता चौक, गणेश रोडने फडके चौक उजवीकडे वळुन मोती चौक सरळ सोन्या मारूती चौक, उजवीकडे वळुन सरळ बेलबाग चौक ते सेवासदन चौक, सरळ लक्ष्मी रोडने टिळक चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचार्‍यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (टिळक चौकाकडू बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी)

२. नकलाकार भोंडे पथ ः= आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक ः मोती चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचार्‍यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (मोती चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे येण्यास बंदी)

३. रामेश्‍वर चौक ते शनिपार चौक ः- रामेश्‍वर चौकाकडून शनिपार चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचार्‍यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (शनिवार चौकाकडून रामेश्‍वर चौकाकडे येण्यास बंदी)

४. टिळक, बाजीराव, कुमठेकर आणि केळकर रोड हे पादचार्‍यांकरिता दुहेरी ठेवण्यात आले आहेत.

————————

प्रमुख मार्गावर पार्किंग निर्बंध

रविवारी सकाळी आठ वाजल्यापासुन लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक आणि शास्त्री रोड तसेच त्यांना जोडणार्‍या उपरस्त्यांचे १०० मीटर परिसरात पार्किंग करिता बंदी करण्यात आली आहे. पोलिस, अग्नीशमन दल, रूग्णवाहिका आणि एमएसईबीचे वायरिंग दुरूस्त करणारे वाहनांना वरील रस्त्यावर वाहने पार्क करण्याची परवानगी आहे.

———————-

मिरवणुकीच्या वेळी बंद करण्यात येणार्‍या रस्त्यांबबात

शिवाजी रस्ता ः काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक —- सकाळी ७ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

लक्ष्मी रस्ता ः संत कबीर चौकी ते टिळक चौक —- सकाळी ७ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

बगाडे रोड ः सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक —- सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

बाजीराव रोड ः बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक —- दुपारी २ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

कुमठेकर रोड ःटिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक —- दुपारी १२ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

गणेश रोड ः दारूवाला पुल ते जिजामाता चौक —- सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

भोंडे / केळकर पथ ः बुधवार चौक ते टिळक चौक —- सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

गुरू नानक रोड ः देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक —- सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

टिळक रस्ता ः जेधे चौक ते अलका टॉकीज चौक —- सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

शास्त्री रस्ता ः सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक —- दुपारी १२ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

जंगली महाराज रोड ः झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक —- दुपारी ४ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

कर्वे रस्ता ः नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक —- दुपारी ४ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

फर्ग्युसन रोड ः फर्ग्युसन कॉलेज गेट ते खंडोजी बाबा चौक —- दुपारी ४ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

भांडारकर रस्ता

भांडारकर रस्ता ः पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक —- दुपारी ४ ते मिरवणुक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)

——————-

* लक्ष्मी रस्त्याचा वापर करणार्‍या पादचार्‍यांनी बेलगाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणार्‍या भाविकांसाठी सेवासदन चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक मार्गे दर्शन घेवुन बेलबाग चौकाकडे जायचे असल्यास पासोडया विठोबा, मोती चौक, सोन्या मारूती चौक, केंजळे चौकाकडून बेलबाग चौकाकडे जावे.

* दुचारी १२ वाजल्यापासून सातारा रस्त्याकडून येणारी वाहने शंकरशेठ रस्ता, गोळीबार मैदान चौक, खान्या मारूती चौक, उजवीकडे वळुन मंम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक डावीकडे वळुन सर्किट हाऊस मार्गे येरवडा चौक उजवीकडे वळुन नगररोडने जातील तसेच नगर कडून सातार्‍याकडे जाणारी वाहने मार्गाच्या उलट दिशेने जातील. तसेच सातार्‍याकडून मुंबईकडे जाणारी व मुंबईकडून सातार्‍याकडे जाणारी वाहने एक्सप्रेस-वे नेच ये-जा करतील.

‪#‎ganpati‬ ‪#‎trafficdiversion‬ ‪#‎Ganeshotsav‬