भीमा कोरेगाव प्रकरणाची सीआयडी चौकशी करा – आमदार प्रकाश गजभिये
नागपूर दि. २ – भीमा कोरेगाव प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करुन जातीयवादी
संघटनांच्या प्रमुख नेत्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.
आमदार प्रकाश गजभिये यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह नागपूर संविधान चौकात
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयासमोर तोंडाला काळया पट्टया बांधून निषेध
व्यक्त केला.
भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना दुर्देवी असून दलित आणि मराठा समाजामध्ये
भांडणे लावण्याचा प्रकार आहे. याचा फायदा उचलण्याचा काही समाजविघातक
प्रवृत्तींचा डाव आहे.याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करत असल्याचे
प्रकाश गजभिये यांनी सांगितले.
या सगळया घटनेचा निषेध करण्यात आला असून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळया पट्टया बांधल्या.यावेळी महिला
शहराध्यक्षा अलका कांबळे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष
नरवाडे,उत्तर नागपूरचे अध्यक्ष महेंद्र भांगे,विजय गजभिये,अमोल वासनिक,राजेश
अधव,अनिकेत गायकवाड,रुद्र धाकडे,वर्षा शामकुळे,अविनाश तिरपुडे,गोपी आंभोरे,अभय
बनसोडे,विलास मालके,चरणसिंह चौधरी,संदीप शाहू,बबलू ढेरिया,दुर्गादास
केवलरामानीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
