महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी खास तयारकेलेले विशेष पॅकेज जाहीर
राजीव काळे, प्रेसिडेंट व कंट्री हेड – हॉलिडेज, माइस, व्हिसा वपासपोर्ट सेवा, थॉमस कूक (इंडिया) लि.
थॉमस कूक इंडियासाठी महाराष्ट्र ही महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि2018-19 साठी कंपनीने आखलेल्या व 39 कन्झ्युमर अॅक्सेस सेंटर्स –मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगरव सोलापूर अशा महाराष्ट्रातील 9 ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या 16 शाखाव 23 गोल्ड सर्कल पार्टनर फ्रेंचाइजी आउटलेट यांचा समावेश असलेल्यानियोजनामध्ये तिचे योगदान मोठे आहे. भारतातील थॉमस कूकच्यासध्याच्या लिजर व्यवसायात महाराष्ट्राचे योगदान 35% आहे ववार्षिक 27% इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. बहुतांश व्यवसायमुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथून निर्माण होत असून तेथे थॉमसकूकसाठी मागणी वाढली आहे.
महाराष्ट्रीयन प्रवाशांना सेवा देण्यासाठी, आपल्या विशेष प्रोजेक्ट टीमनेकेलेल्या सखोल बाजार व ग्राहक संशोधनाच्या मदतीने थॉमस कूकइंडियाने महाराष्ट्रासाठी विशेष रिजनल टूर्स घोषित केल्या आहेत – ‘अविस्मरणीय युरोप’ व ‘प्रेक्षणीय युरोप’ या टूर्समध्ये युरोपातीलठिकाणांचा समावेश आहे. या प्रमुख मराठी युरोप टूर्स वार्षिक 30-40%दराने वाढत आहेत.
या टूर खास महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी तयार करण्यात आल्या असूनत्यामध्ये समाविष्ट आहे:
– मराठीबोलणारा मराठीमाणूस टूर मॅनेजर(अनुभव, कौशल्य,मनमिळावू) –तज्ज्ञ असलेला,पण मैत्रीपूर्णवागणारा “भाऊ”.
– मराठीबोलणाऱ्यामहाराष्ट्रीयनप्रवाशांचा ग्रुप
– टूरमध्येमहाराष्ट्रीयनलज्जतदार पदार्थव घरीबनवल्याप्रमाणेमहाराष्ट्रीयन जेवण
राजीव काळे, प्रेसिडेंट व कंट्री हेड – हॉलिडेज, माइस, व्हिसा वपासपोर्ट सेवा, थॉमस कूक (इंडिया) लि. म्हणाले, “आमच्या थॉमसकूकच्या आउटबाउंड व्यवसायामध्ये महाराष्ट्राचे योगदान 35% आहे आणिप्रचंड वाढ व उच्च क्षमता विचारात घेता, कंपनीने महाराष्ट्रावर विशेष भरदेण्याचे ठरवले आहे.”
त्यांनी सांगितले, “एकनिष्ठ व महाराष्ट्रीयन ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्हीखास रिजनल टूर पॅकेज जाहीर केली आहेत. ही पॅकेज आंतरराष्ट्रीयहॉलिडेमध्ये असताना प्रादेशिक अनुभव देतात आणि त्यासाठी ग्राहकांचामोठा प्रतिसाद मिळत असून, बुकिंगमध्ये वार्षिक 30-40% वाढ होत आहे.”
