मॅग्मा वंचित कुटुंबांतील गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

Share this News:

मुंबई, 8 जून 2018: मॅग्मा फिनकॉर्प लि.ने वंचित कुटुंबांतील गुणवान विद्यार्थ्यांसाठी एम स्कॉलर हा नावाजलेला शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या तीन वर्षांत, मॅग्माने 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.

भारतात तरुणांची संख्या लक्षणीय असून त्यांना प्रगती करायची आहे. भारतात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मोफत असले तरी घरची आर्थिक-सामाजिक स्थिती हालाखीची असल्याने असंख्य विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे शाळा सोडण्याची मुख्य कारणे गरिबी, गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधीचा अभाव व देशाच्या एकाकी भागांत अपुऱ्या पायभूत सुविधा – प्रामुख्याने मुलींसाठी, ही आहेत. यामुळे हुशार व गुणवान असलेल्या विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळा व कॉलेज सोडावे लागते.

छोट्यातल्या छोट्या स्वप्नासाठी गुंतवणूक करणे हे ब्रीद अवलंबत,मॅग्माने 2015 पासून एम-स्कॉलर या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक कामगिरीनुसार व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीनुसार केली जाते.

मीडियाशी बोलताना, मॅग्मा फिनकॉर्प लि.च्या सीएसआर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व अॅडमिन विभागांचे उपाध्यक्ष कौशिक सिन्हा यांनी या कार्यक्रमाविषयी व अर्जाच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली. या वर्षीची एम-स्कॉलरची नवी बॅच जाहीर करताना मॅग्माला अतिशय आनंद होत आहे. एम स्कॉलर वंचित कुटुंबांतील 200 गुणवान विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी मदत करत आहे व नव्या बॅचमधील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे”, असे सिन्हा यांनी सांगितले.

शिष्यवृत्तीचा तपशील:

· विद्यार्थी भारताचा नागरिक असायला हवा

· अर्जदाराचे जास्तीत जास्त वय 15 ऑगस्ट 2018 रोजी 20 वर्षे असावे

· विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाखेतील 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल किंवा इंजिनीअरिंग, मेडिकल, लॉ अशा प्रोफेशनल/स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमांसाठी 4 वर्षे

· अर्जदाराने संबंधित स्टेट बोर्ड परीक्षेत (बारावी) किमान 80% गुण मिळवलेले असावेत

· घराचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा (दहा हजार रुपये) कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील

अर्ज करण्याची प्रक्रिया:

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज व पुढील कागदपत्रे मॅग्मा फिनकॉर्प लि.च्या कार्यालयात पाठवता येतील:

1. योजनेमध्ये सहभागी होण्याबाबतचा अर्ज

2. बारावीच्या मार्कशीटची अटेस्टेड प्रत

3. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

4. वयाचा पुरावा (शालेय प्रमाणपत्र/अडमिन कार्ड)

5. पत्त्याचा पुरावा व ओळखीचा पुरावा

6. पालकांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र (घराचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये/किंवा त्याहून कमी असायला हवे)

7. कॉलेज प्रवेशाचा पुरावा (पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी)

8. बँक खात्याचा तपशील

9. शाळेकडून कॅरॅक्टर सर्टिफिकेट