राष्ट्रवादी भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन

Share this News:

मुंबई-दि.३ जानेवारी २०१७ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने स्त्री शिक्षणाचा पाया रचून स्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मंगळवार, ३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, साहित्य-कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.