आरटीईमधे शाळा प्रवेशात अनाथ मुलांचे अनाथलायाचे कागदपत्रेच ग्राह्य मानले जावे : मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

Share this News:

मुंबई, दि. 22/8/2019 : शाळा प्रवेशात आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया राबवताना अनाथ मुलांच्या कादपत्रांसाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. यापुढे अशा अनाथ मुलांवर शाळा प्रवेशात अन्याय होऊ नये म्हणून अनाथालयाची कगदपत्रे ग्राह्य धरुन प्रवेश देण्यात यावेत, असे शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

अनाथ मुलांच्या शाळा प्रवेशात कागदपत्रांच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः त्यांचे उत्पन्नाचे दाखले मागितले जात असत तसेच त्यांच्या नावासमोर जात व शेवटचे नाव काय लिहावे याबाबत संभ्रम होता. त्यामधे सुस्पष्टा आणण्यासाठी आज महत्त्वाचा शासन निर्णय जरी करुन शिक्षण मंत्री अॅड आशिष शेलार यांनी या मुलांना मोठा दिलासा दिला आहे.

याबाबत निर्णय खालीलप्रमाणे

· आर टी ई 25% प्रवेशाकरिता बाल सुधारगृह/अनाथालये मधील विद्यार्थी या संवर्गाचा समावेश करण्यात यावा तशी सुविधा एन आय सी पुणे यांनी पोर्टल मध्ये उपलब्ध करावी

· अन्यथा बालकांच्या प्रवेशाकरिता अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत

· अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये

· सरल डेटाबेसमध्ये अनाथ विद्यार्थ्यांकरिता खालील सुविधा एन आय सी पुणे यांनी उपलब्ध करावीत

१. विद्यार्थ्यांचा पिता/आई यांचे नाव माहित नसल्याकारणाने मधले नाव या ठिकाणी Not known सुविधा उपलब्ध करावी.

२. शेवटचे नाव या ठिकाणीसुद्धा Not known सुविधा उपलब्ध असावी

३. धर्म माहिती नसल्याने Other सोबत Not known सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

४. Category यामध्ये अनाथ असे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असावी

५. अनाथ मुले शाळेत प्रवेशानंतर दत्तक गेल्यास दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव आडनाव अद्ययावत करण्यासंदर्भात माहिती New entry tab द्वारे उपलब्ध करून देण्यात यावी.