” आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी ” नवभारतनिर्मिती संकल्प अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

Share this News:

” आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी ” नवभारतनिर्मिती संकल्प अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवरील वंडरलँड समोर आयोजित करण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उदघाटन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी यांच्याहस्ते करण्यात आले . यामध्ये पुणे कॅम्प भागातील महिला बचतगटांनी सहभाग घेतला . यामध्ये दिवाळी पणत्या , कपडे , अत्तरे , उंटणे , विणकाम केलेल्या पिशव्या , कापडी पिशव्या आदी वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या . त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती .

हे प्रदर्शन पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवरील वंडरलँड समोर शनिवार १४ ऑक्टोबर २०१७ व रविवार १५ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मांडण्यात येणार आहे . तरी महिला बचत गटामधील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी वस्तू घेऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी यांनी केले .

Follow Punekar News: