आयडियातर्फे कार्बनच्या स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्सच्या रेंजवर आकर्षक कॅशबॅक ऑफर
दुर्गम भारताशी जोडले जाऊन मोबाईल इंटरनेटचा जास्तीत जास्त प्रसार करण्याच्या आपल्या मोहिमेंतर्गत, आयडिया सेल्युलर या भारतातल्या सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांपैकी एका कंपनीने कार्बनच्या स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्सच्या व्यापक रेंजवर विशेष कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे.
स्मार्टफोन्सवरील कॅशबॅक ऑफर –
ए 41 पॉवर आणि ए 9 इंडियन (किंमती 2,999 रुपये व 3,999 रुपये अनुामे) या स्मार्टफोन्सवर 1,500 रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत असून यामुळे आयडिया ग्राहकांसाठी या 4 जी फोन्सची प्रभावी किंमत जवळजवळ अर्धी होणार आहे. आयडिया ग्राहकांच्या आयडिया वॉलेटमध्ये पहिल्या अठरा महिन्यांनंतर 500 रुपये तर, 36 महिने पूर्ण झाल्यानंतर 1,000 रुपयांचा बॅलन्स ोडीट करण्यात येईल. आयडियातर्फे युवा 2 (किंमत 4,999 रुपये) या स्मार्टफोनवरही 2000 रुपयांची कशॅबॅक ऑफर देण्यात येणार असून यामुळे हा 4 जी स्मार्टफोन ग्राहकांना प्रभावी रुपाने 2,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. आयडिया ग्राहकांच्या आयडिया वॉलेटमध्ये पहिले 18 महिने पूर्ण झाल्यानंतर 500 रुपये तर, 36 महिने पूर्ण झाल्यानंतर 1,500 रुपये बॅलन्स क्रेडीट करण्यात येईल.
ए 41 पॉवर, ए 9 इंडियन आणि युवा 2 या स्मार्टफोन्सवर कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना पहिल्या 18 महिन्यांच्या कालावधीत एकूण 3,000 रुपयांचे आणि त्यापुढील 18 महिन्यांमध्ये याच रकमेइतके रिचार्ज करावे लागेल. आयडिया ग्राहकांना 169 रुपयांचे रिचार्ज करता येईल. यात त्यांना 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह अमर्याद लोकल आणि एसटीडी कॉल्स, मोफत रोमिंग, 1 जीबी प्रति दिवस डेटा आणि 100 एसएमएस प्रति दिन या सुविधा मिळणार आहेत.
फीचर फोन्सवरील कॅशबॅक ऑफर्स –
कार्बन के 310 एन, के 24 आणि के 9 जम्बो या फीचर फोन्सवर (किमत अनुामे 999 रुपये, 1,199 रुपये आणि 1,399 रुपये) आयडियातर्फे प्रत्येकी 1 हजार रुपये कॅशबॅक देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांना हे फोन फारच कमी किमतीत उपलब्ध होतील. परिणामी, 36 महिन्यांनंतर के 310 एन हा फोन ग्राहकांना प्रभावी रुपाने मोफतच मिळणार आहे.
फीचर फोन्सवरील 500 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी आयडिया ग्राहकांनी पहिल्या 18 महिन्यांत एकूण 2700 रुपयांचे रिचार्ज करणे आणि ऊर्वरित 500 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी 19 ते 36 महिन्यांत एकूण 2700 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. या ग्राहकांना विशेष 145 रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉल्स, 500 एसएमएस, 0.5 जीबी डेटा 28 दिवसांसाठी मिळू शकणार आहे. ग्राहकांच्या मुख्य खात्यात टॉकटाईमच्या रुपात हा कॅशबॅक जमा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना आयडिया सेल्युलरचे वरिष्ठ विपणन अधिकारी श्री. शशी शंकर म्हणाले, ‘‘चांगल्या दर्जाचे मोबाईल डिव्हाईस किफायतशीर किंमतीत मिळाले की ग्राहकांचा अनुभवही त्यासोबत विकसित होतो. भारतात 4 जीचा प्रसार करण्यासाठी यामुळे चालना मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. कार्बनशी भागीदारी करून स्मार्टफोन आणि फिचरफोन ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना 4 जी तंत्रज्ञान अधिक जलद आत्मसात करता यावे, यासाठी आयडियाची ही कॅशबॅक ऑफर फारच उपयुक्त ठरणार आहे.’’
आयडिया सेल्युलरशी केलेल्या भागीदारीबाबत बोलताना कार्बन मोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप जैन म्हणाले, ‘‘आमच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक ऑफर आणि विविध सेवा पुरवण्यासाठी आयडिया सेल्युलरशी भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीयाला स्मार्ट टेलिफोनी अवलंब करून डिजिटल आधुनिक होण्यासाठी प्रोत्साहित व सक्षम करण्याकरिता या दोन्ही ब्रॅण्ड्सच्या क्षमता या भागीदारीमुळे एकत्र आल्या आहेत. अग्रेसर भारतीय ब्रॅण्ड म्हणून, या भागीदारीमुळे स्मार्टफोन युजर्सना मोठा फायदा होणार असून फीचर फोन्स वापरणार्या आमच्या ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे. ग्राहकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीचे वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून त्यांच्या गरजांचा आम्ही गांभीर्याने विचार करतो. अशा भागीदार्यांच्या माध्यमातून आमचे नेटवर्क अधिक व्यापक करण्याचा आम्हाला आनंद होत आहे.’’
