कोलगेट भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रॅण्ड

just pune things app
Share this News:

कोलगेट़ पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड या ओरल केअर क्षेत्रातील अग्रेसर कंपनीला भारतातील सर्वांत विश्वसनीय ब्रॅण्ड्स 2017 या सर्वेक्षणात प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला असून हे सर्वेक्षण नेल्सनतर्फे आयोजित करण्यात आले होते. याचे परिचालन ब्रॅण्ड इक्विटीतर्फे करण्यात आले. कोलगेट या ब्रॅण्डला सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वांत विश्वसनीय ब्रॅण्डचे स्थान लाभले असून इतकी वर्षे आपले स्थान सातत्यपूर्ण रितीने टिकवून ठेवणारा हा एकमेव ब्रॅण्ड आहे.

याबाबत बोलताना कोलगेट़ पामोलिव्ह इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. इस्साम बचालानी म्हणाले, कोलगेटवर दररोज विश्वास ठेवल्याबद्दल आमच्या सर्व ग्राहकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. भारताला सतत हसवत ठेवण्यासाठी आमच्या विश्वासार्हतेचीच आम्हाला मदत झाली आहे. आता जवळजवळ 80 वर्षे, कोलगेट हा ब्रॅण्ड भारतातील मौखिक आरोग्यासाठी जागरुकता निर्माण करीत आहे. प्रत्येकाला एक हसरा भविष्यकाळ मिळवण्याचा हक्क आहे, हेच यामागचे तत्व आहे.

सर्वेक्षणाविषयी…
2017 मधील सर्वांत विश्वसनीय ब्रॅण्ड्सच्या सर्वेक्षणासाठी विविध ब्रॅण्ड्स व कॅटेगरींची निवड करताना पहिल्या टप्प्यात, त्या-त्या ब्रॅण्ड्सची विक्री, त्यांची सामाजिक पत आणि प्रसारमाध्यमांतील डेटा यांचा सखोल अभ्यास व त्याविषयी चर्चा करण्यात आली. ब्रॅण्ड इक्विटी टीम आणि नेल्सनची संशोधन टीम यांच्यात सखोल चर्चा झाल्यानंतर या सर्वेक्षणासाठी ब्रॅण्ड्सची यादी आणि कॅटेगरींची निवड करण्यात आली. यंदा, या सर्वेक्षणात खाद्यसेवा या नवीन कॅटेगरीची ब्रॅण्ड यादीत भर घालण्यात आली. यंदाच्या सर्वेक्षणात भारतातील विविध शहरांतल्या 6059 ब्रॅण्ड्सपैकी 342 ब्रॅण्ड्सचा अंतिम सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. यात बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, भूवनेश्वर, चंदीगड, इंदूर, लखनऊ, पटणा आणि विजयवाडा या शहरांचा समावेश होता.