Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

झाडा खालची शाळा

By Gauri Gokhale

बाणेर पुणे येथील माझा रोजचा ऑफिस वरून घरी यायचा जायचा रास्ता आणि रस्त्यात पडत एक भलं मोठं झाड.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या या धकाधकीच्या युगात एक अश्या पद्धतीची शाळा कोणी भरवत असेल ह्याचा मी  स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. अशी शाळा जणू  पूर्वीचा काळात गावाकडेच बघायला मिळायची.

मनात त्या बाईंना भेटण्याची उत्सुकता लागली होती व कधी एकदा त्यांना भेटून तुम्ही येथे नक्की काय करता, कश्यासाठी करता व नेमका हेतू काय आहे असे एक नव्हे तर अनेक प्रश्न माझ्या मनात घोंगावत होते.

शेवटी तो दिवस आलाच आणि मी त्यांना भेटले. पूजा जुन्नरकर हे त्यांचा नाव व डोअरस्टेप  सौंस्थे तर्फे त्यांची निवड ह्या मुलांसाठी केलेली आहे.  मला पडलेल्या प्रश्नांचा उलगडा मी करून घेत होते.

हे सर्व करत असताना मला त्या शिक्षिकेचा एक आदर्श डोळ्यापुढे दिसला. आजच्या काळात कोणी अश्या प्रकारे गरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी  प्रोत्साहन व मदत करू शकेल?

दोन मोठी झाडे व त्या खाली बिन भिंतीचा शाळेत बसलेली हि छोटी मुलं. हि शाळा दुपारी एक ते पाच या वेळेत भरते आणि इथे रोज ३० ते ३५ मुलं नियमांनी नाचूकता येतात. विशेष म्हणजे या शाळेत कोणता हि फळा किव्वा आजकालचा काळात असलेला डिजिटल बोर्ड मला सापडला नाही. जमिनीवर चटई घालून त्यावर ती मुलं बसून आपल्या एकमेव शिक्षिके सोबत शिकण्याचा आनंद घेत होते. या सगळ्यात मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या शिक्षिकेची तळमळ आणि मुलांची ज्ञान मिळण्याची अतूट धडपड.

घरच्या बिकट परिस्थितीमुळे  काही मुलं इच्छा असूनहि शाळेत जाऊ शकत नाही तर ह्या मुलांसाठी पूजा (शिक्षिका) आपली रोजची दुपार या मुलांचा न्यानार्जानात घालवते.

शाळेची सुरवात हि प्रार्थनेने होते. विविध प्रकारच्या गोष्टी , कविता, गाणी, सामान्य ज्ञान व इतर विषय या शाळेत शिकवले जातात.

ज्ञान  देणं आणि ते ग्रहण करणं पण जणू एक कालच आहे. ज्याला त्या ग्रहणाची मनःपूर्वक इच्छा असते त्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

हे सगळं पाहून आणि ऐकून मला खूप गलबलून आलं, असा वाटलं  कि आजच्या तारखेत सुद्धा माणुसकी हि  जिवंत आहे आणि असे काही मानव आजही आहेत जे  निस्वार्थपणे  स्वतःची कला अर्पण करण्यास उपलब्ध असतात

चला मित्रांनो बनूया यांचा पैकी एक.