दुष्काळी चर्चेवरील विधानसभेतील उत्तर

Share this News:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

· दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्‍न या विषयावर झालेल्या चर्चेला विधानसभेत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

· दुष्काळ:कृषी पंपाच्या चालू वीज देयकात 33.5% सूट दिल्याने 19,45,183 शेतकरी लाभार्थी, सुमारे ३५३ कोटी रूपये लाभ दिला.

· परीक्षा शुल्क माफी यातून शेतकरी कुटुंबातील सुमारे 9.5 लाख विद्यार्थ्यांना 40 कोटींचा दिलासा मिळाला आहे.

· गेल्या वर्षभरात सुमारे १ कोटीवर शेतकऱ्यांना १०,५८२ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत आजवरच्या इतिहासात मिळाली नाही, इतकी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळाली.

· सुमारे 42 लाख शेतकऱ्यांना 1806 कोटी रूपये नुकसानभरपाई विम्याच्या माध्यमातून देण्यात आली: मुख्यमंत्री

· नव्या आर्थिक वर्षात 82.57 लाख शेतकरी विम्याच्या कक्षेत आले.

· 61,23,259 शेतकरी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत १ लाख मेट्रिक टनाहून अधिक धान्य वाटप करण्यात आले आहे:मुख्यमंत्री

· राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केल्यापासून आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 24118 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला.

· सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ.

· यापूर्वी केवळ 1 लाख रूपये नुकसानभरपाई पोटी मिळायचे आता त्याऐवजी 2 लाख रूपये मिळणार आहेत.

· राज्यातील 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या विविध कामांच्या माध्यमातून 24 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला.

· जलयुक्त शिवार: आमदारांच्या अध्यक्षतेत तालुका पातळीवर समित्या स्थापन करणार.

· जलयुक्त शिवारसाठी आणखी ५००० गावांची निवड करण्यात आली, जनसहभाग देणाऱ्या गावांचा आणखी समावेश करणार.

· आता मागेल त्याला शेततळे.

· गेल्यावर्षीपेक्षा कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 6.5 लाखांची वाढ, कर्जाच्या रकमेत 4129 कोटी रुपयांची वाढ.

· गेल्या वर्षांत ४९ हजार विहिरी बांधण्यात आल्या. यापूर्वी केवळ एका वर्षात १६ हजार विहिरी बांधल्या जायच्या.

· रोजगार हमी योजना: 2015-16 मध्ये आतापर्यंत 417.68 लाख मनुष्यदिन निर्मिती. यावर खर्च 1181.39 कोटी.

· २०१५-१६ यावर्षात २६,८२९ वीजजोडण्या अवघ्या ८ महिन्यात दिल्या. जून २०१६ पर्यंत पेड पेंडिंग पूर्ण करू.

· रेमंडचा अमरावतीत नवा उद्योग. 1500 कोटींची गुंतवणूक, 10 हजार रोजगार निर्मिती होणार.

· मोर्शीत १०० एकर जागेवर संत्रा प्रक्रिया प्रकल्प, नोगा ब्रांड कायम ठेवणार.

· विदर्भातील दुग्धोत्पादन व दूध गुणवत्तावाढीसाठी नेस्लेचे सहकार्य करणार, भंडारा-गोंदियात मोठया गुंतवणुकीचा प्रस्ताव.

असा आहे 10 हजार 512 कोटींचा विशेष कार्यक्रम

· दुष्काळामुळे बाधित 15 हजार 747 गावांमधील शेतकऱ्यांना मदत. यात बाधित 53 लाख 19 हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपातही मदत : 7412 कोटी
(82 लाख शेतकऱ्यांना पीकविमा 2800 कोटी+ विमा नसलेल्या कापूस/सोयाबीन उत्पादकांसाठी 1034 कोटीसह)
· जलयुक्त शिवार : 1000 कोटी
· मागेल त्याला शेततळ्यांसाठी: 250 कोटी
(याशिवाय २०१९ पर्यंत एकूण २५०० कोटी रुपये)
· धान खरेदीसाठी प्रोत्साहनपर अनुदान 200 रूपये प्रतिक्विंटल: 100 कोटी
· 33 हजार विहिरींसाठी: 750 कोटी
· विहिरींना वीज जोडणीसाठी इन्फ्रा : 1000 कोटी
……………………
एकूण : 10 हजार 512 कोटी
(टीप : या रकमेत शेततळेसाठी या वर्षातील रक्कम आहे.)