देशातील स्त्रीभ्रूण हत्येतील चिंताजनक वाढीमुळेच नरेन्द्रभाई मोदींकडून बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम-आ.माधुरी मिसाळ

Share this News:

कोथरूड विधानसभा मतदारसंघात बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचा प्रारंभ करताना आणि या उपक्रमा अंतर्गत ख्वादा तील अभिनेत्री कु.वैष्णवी ढोरे हिचा सत्कार व कन्या पूजन करताना मला मनस्वी आनंद होत आहे.आमच्या या संत ज्ञानेश्वर वसाहतीत राहणारी आणि आई वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्यानंतर आजी आजोबांनी मायेने सांभाळ केलेली वैष्णवी आज ख्वाडा सारख्या अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटात नायिका म्हणून अभिनय करते,भारत नाट्यम मध्ये नैपुण्य मिळवते,ती खरया अर्थाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार शिक्षण मंडळ सदस्य व बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाच्या पुणे शहर सह संयोजिका सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी काढले.कोथरूड येथे बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचा प्रारंभ करताना कन्या पूजन व ख्वाडा तील याच वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी ढोरे च्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.

आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत,मात्र अजून ही स्त्रीभ्रूण हत्या होत आहे,महिलांवर अत्याचार होत आहेत आणि स्त्रीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही याची खंत वाटते असे नमूद करून मुलींना नुसते वाचवू नका तर त्यांना शिकवा आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्या असे आवाहन आ.मेधा कुलकर्णी यांनी केले.पुण्यात नुकत्याच संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या किवा जीन्स घातली म्हणून पत्नीचा खून करणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करून पुरुषी मानसिकतेच्या विकृतीचे हे बळी ठरले असून ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

देशातील स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून महिलांचे घटते प्रमाण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम देशभर सुरु केला असल्याचे या मोहिमेच्या महाराष्ट्राच्या प्रमुख आ.माधुरी मिसाळ यांनी सांगितले.हजार पुरुषांमागे ८३२ महिला राहिल्या असल्याचे निदर्शनास आल्यावर मोदिजींनी ही मोहीम देशभर राबविण्याचा निर्णय घेऊन आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला असून ही मोहीम महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवेन असे ही त्या म्हणाल्या.स्त्री मुक्ती म्हणजे स्त्रियांनी मुक्त वागावे,पुरुषांवर अत्याचार करावेत असे नाही तर स्त्रियांनी घरातील सर्वांना बरोबर घेऊन यश मिळवायचे आहे.आदिशक्ती च्या रूपातील देवी ला सर्व देवतांनी पाठबळ दिले म्हणूनच त्यांनी राक्षस संहार केला याचा संदर्भ देऊन स्त्री व पुरुषांनी एकत्र येऊन संसाराचा गाडा हाकावा व बेटी बचाव बेटी पढाव हे सार्थ करावे,असे ही त्या म्हणाल्या.

संदीप खर्डेकर यांनी आ.माधुरीताई,आ.मेधा ताई व सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या मुलींना कसे संस्कार दिले व त्या कश्या उच्च विद्या विभूषित झाल्या याचे वर्णन करताना त्याचे सर्वांनी अनुकरण करावे असे आवाहन केले.तसेच ५ वर्षाची चिमुरडी वैष्णवी नवरात्र व गणेशोत्सवात हिरीरीने भाग घ्यायची व आता कार्यक्रम कधी,स्पर्धा कधी आहेत अशी विचारणा करायचे ही आठवण सांगून संदीप खर्डेकर यांनी तिला भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिले.

यावेळी भाजप चे शहर सरचिटणीस व बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचे पुणे शहर प्रमुख दीपक मिसाळ,कोथरूड मंडळ अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी,जयंत भावे,प्रशांत हरसुले,विभीषण मुंडे,भारत कदम,निलेश गारुडकर,जनार्दन क्षीरसागर,सौ.संयुक्ता छत्रे,संगीता आदवडे,मानिक्ताई दीक्षित,सौ.ठिपसे,जयेश सरनौबत,मुकेश अनिवसे,पोपट बालवडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक केले,कोथरूड भाजप चिटणीस सुधीर फाटक यांनी सूत्र संचालन केले,तर श्रीकृष्ण गोगावले यांनी आभार व्यक्त केले.यावेळी संपूर्ण वस्ती आपल्या लेकीच्या सत्काराला उपस्थित होती.या कार्यक्रमात लहान मुलींना ओवाळून व त्यांना भेटवस्तू देऊन कन्या पूजन करण्यात आले.

‪#‎beti‬ Beti Bachao Beti Padhao ‪#‎VaishnaviDhore‬ ‪#‎SaveGirlsChild‬‪#‎RespectWomen‬ Khwada-ख्वाडा ‪#‎Khwada‬ Bharatiya Janata Party (BJP) BJP PUNE

Follow Punekar News: