फक्त मराठीची ‘व्हॅलेंटाइन भेट’

just pune things app
Share this News:

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन डे प्रेमिकांसाठी महत्त्वाचा दिवस. प्रेमवीर हा सोहळा उत्साहात साजरा करतात. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची रीत मात्र न्यारी असते. कुणी समुद्र किनारी, कुणी कट्ट्यावर,हॉटेलमध्ये तर कुणी कँडल लाइट डीनर घेत, आपलं प्रेम व्यक्त करत, ‘व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. या व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधत प्रेमाची खास गोष्ट शेअर करण्यासाठी फक्त मराठी वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

प्रेक्षकांना आपल्या ‘प्रेमाची गोष्ट’ एका व्हिडीओद्वारे शेअर करायची आहे. हा व्हिडीओ १ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. आपल्या प्रेमळ आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ प्रेक्षकांना शनिवार १० फेब्रुवारी पर्यंत ७७१००८८४४५या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत. व्हॅलेंटाइन डे ला म्हणजे १४ फेब्रुवारीला हे खास व्हिडीओ फक्त मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत. विजेत्या प्रेक्षकांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हॅलेंटाइनडे फक्त मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल हे नक्की.