मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ  संपन्न

just pune things app
Share this News:

मराठवाडा मित्रमंडळ च्या विविध महाविद्यालयातील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ आज कर्वेनगर मधील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.या वेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय चे संचालक डॉ. अभय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या सहा महाविद्यालयाचा हा पदवीग्रहण समारंभ होता. सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी यावेळी पदवीग्रहण केली.यात अभियांत्रिकी, फार्मसी, कायदा, वाणिज्य व आर्किटेक्चर अशा विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुणे डॉ. अभय वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, “आजच्या आर्थिक आघाडीमध्ये भारतला तरुणांचा देश असे म्हटले जाते. आजच्या घडीला शेती, औद्योगिक, उत्पादन आणि तंत्रज्ञान इत्यादिसारख्या प्रमुख क्षेत्रांचे जीडीपी मध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु, यात औदयोगिक क्षेत्राचे योगदान केवळ 28% च असून उत्पादन क्षेत्राचा सहभाग 17 ते 18% आहे. जर आपल्याला भारताच्या जीडीपी मध्ये औद्योगिकआणि उत्पादन क्षेत्राचे योगदान 9 0% पर्यंत आणायचे असेल तर हे २०२५ पर्यंत तांत्रिक कुशलतेच्या बळावरच साध्य होऊ शकेल”. या पुढे ते असेही म्हणाले कि,” फक्त शिक्षणाची पद्धत बदलून चालणार नाही, तर उद्योगामध्ये नवीन तांत्रिक साधने आणि कौशल्याचा वापर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना औद्योगिक आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळायला हवे , जेणेकरुन ते लवकरच यशस्वी उद्योजक बनतील आणि भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल .”

या वेळी मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महविद्यालायाचे प्राचार्य डॉ.लॉरेन्स असे म्हणाले की, “हे वर्ष संस्थेचे सुवर्णमोहोत्सवी वर्ष असल्यामुळे हा पदवीग्रहण समारंभ संस्थे साठी खुप महत्वाचा आहे.आमच्या सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत मला ठाम विश्वास आहे की सर्वांची मेहनत आणि त्याला असलेली अनुभवाची जोड यामुळे संस्थेची वाढ होते आणि आणखी मोठी उंची गाठता येते ”

या प्रसंगी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य बी. जी. जाधव म्हणाले, “गेल्या ५० वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी देशात तसेच जगभरात विविध क्षेत्रात आपल्या संस्थेचे नाव उंचावले आहे विद्यार्थ्यांचे यशच संस्थेसाठी अतिशय महत्वाचे आहे”.

या सोहळ्यात महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य बी. जी. जाधव, उपाध्यक्ष डॉ. एम. वी सुर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. संपतराव जाधव, उप कार्यकारी अध्यक्ष डॉ. एन.व्ही. बिरादार, सचिव श्री. किशोर एच. मुंगळे, खजिनदार श्री. अण्णासाहेब पवार, संयुक्त सचिव श्री एन. टी. टिकेकर, संयुक्त सचिव श्री संजय एस. गर्गे, कार्यकारिणीचे सदस्य डॉ. शंकररराव एच. वाणे, डॉ. वी. एस. पाटील, श्री. डी. एस भंडारी, श्री. तेज. पी निवाळकर, श्री. एस. एस. सूर्यवंशी, श्री. जितेंद्र एम. पवार, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.

समारंभाच्या शेवटी प्राध्यापक व्ही. बी. देवकांबळे यांनी आभारप्रदर्शन केले त. र समारंभाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रा. पी. के. तामखडे आणि डॉ. (सौ.) सुजाता शेणई यांनी सांभाळली.