Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्कार

पुणे, दि. १९ डिसेंबर २०१७ : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श अभियंता’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनने वीजक्षेत्रातील गेल्या ३३ वर्षांच्या सेवेची दखल घेत श्री. शिंदे यांना सन्मानित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाच्या डोंगरावर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक श्री. चंद्रकुमार नलगे यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे, अविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे म्हणाले, की सेवाक्षेत्रातील सार्वजनिक संस्थेत आपले कर्तव्य व जबाबदारींचे काम चोखपणे केल्यास त्याचा फ़ायदा सर्वसामान्यांना होतो. मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी अभियंता म्हणून विविध पदांवर केलेले काम उल्लेखनीय आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. नलगे म्हणाले, अभियंता हे समाज घडविणारे आहेत. आपल्या कौशल्यातून विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाने देशाला प्रगतीपथावर नेणारे आहेत. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचा गौरव करून अविष्कार फाऊंडेशनने चांगल्या कामाची दखल घेतली आहे.