रक्ताचे नाते सांगणारा जीवनदाता
डॉ. शाळीग्राम भंडारी , तळेगाव दाभाडे
हि नात्यापलीकडे नाती सांगणारी रक्ताचे नाते नामक संस्था स्थापन करून आजवर हजारो रुग्णांना पुनर्जन्म देणाऱ्या ” रामभाऊ बांगड ” नामक मानवता भूषण थोर संजसेवकांची कहाणी आपल्या आगळ्या वेगळ्या कार्याने समर्पित झालेल्या माणसामध्ये राम बांगड हे होत रामभाऊची जवळची एकूणच जीवन वाटचाल अंत्यन्त प्रेरणादायी आहे त्यांचे जीवन व कार्याची ओळखच वेगळी आहे . एका झोपडित राहणाऱ्या बांगड कुटुंबात रामभाऊंच्या जन्म झाला , परंतु अंत्यन्त प्रतिकूल परिस्थिती त्यांनी जीवनात अनेक संघर्ष पत्करून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण केला .
श्रमदेवीची पूजा केल्याशिवाय लक्ष्मी देवीचे दर्शन नाही . जीवनवाटचालीचा प्रेरणा देणारा हा धडा रामभाऊंना लहानपणापासूनच समजला . आपली बँक ऑफ महाराष्ट्र मधील नोकरी सांभाळून त्यांनी आपला या कामाचा वसा चालविला . एकदा अचानक त्याच्या वस्तीच्या मागे असलेल्या इमारतीचा एक भाग कोसळला . त्यात एका चौदा वर्षाची एक मुलगी जबर जखमी . तिला ससून रुग्णालयात नेले तेव्हा तातडीने तिला रक्त देण्याची आवश्यकता होती त्या दृष्टीने तिथे धावपळ सुरु झाली , तेव्हा त्याच्या लक्षात रक्तदानाचे महत्व आले . त्यांनी तिथे स्वतः रक्तदान केले . त्याचक्षणी त्यांनी फावल्या वेळात रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा ठाम निश्चय केला . रक्तदान म्हणजे जीवनदान यासारखे पुण्यकर्मच नाही आणि दुसरी समाजसेवाच नाही . विचार पक्का केला आणि वाटचालीचा शूमारंभ झाला .
रक्तदात्यांना प्रवृत्त करता करता रक्तदान शिबिराचे आयोजन करता करता रक्ताचे नामक एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली . आज या संस्थेमार्फत गरजू रुग्णालय व व्यक्तीसाठी प्रतिदिन ४० ते ५० रक्तदात्याचाही पुरवठा करू शकतात . कुठूनही इमर्जन्सी कॉल आला कि रामभाऊंकडून रक्तदाता हजर . प्रतिवर्षी १० ते १२ लाख रुपये किमतीचे रक्त रक्तदात्याकडून अगदी मोफत दिले जाते , त्यातूनच आजवर ५०००० चे वर रुग्णाचे प्राण वाचले . या कामात त्यांचे बँकांमधील सहकारी . मित्र , नातेवाईक , विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती , अनेक संस्था त्यांना भरभरून साथ देतात . विशेष म्हणजे त्यांची पत्नी मुलगा यांचे सक्रिय योगदान अपूर्व असेच आहे . याचा रामभाऊंना सार्थ अभिमान आहे .
बॉम्बे पॉझिटिव्ह या अतिदुर्मिळ रक्ताच्या गरजेपोटी महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केले आहे , जगात या रक्तगटाचे ४०० / ५०० रक्तदाते आहेत . रक्ताचे नाते मुळेच विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती बरोबरच महाराष्ट्रभर त्यांची ओळख जवळीक निर्माण झाली आहे . रामभाऊ बांगड यांनी स्वतः आजवर १३५ वेळा रक्तदान व २० वेळा प्लेट दान केले आहे .
अजूनही दूर दूर पर्यंत गरजूना रक्त मिळणे सुलभ नाही याची वेदना रामभाऊंच्या मनी आहे . भविष्यात गरजूना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्याची त्यांची मनिषा आहे . म्हणूनच समाजातील विविध सक्षम व्यक्ती संस्थांकडून त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे . रक्ताचे नाते ट्रस्टद्वारा डोनर कार सुरु करीत आहेत .
जेथे कर्तृत्वाची जागृती , भगवंतांची स्मृती आणि अपार मानवता आहे तिथेच ईशकार्याचे दर्शन घडते , याची प्रचिती म्हणजे रामभाऊ बांगड . रक्तदाना सारखे महापुण्यकर्म हीच त्यांची खरीखुरी ईश पूजा आहे . समर्पितपणे करीत असलेल्या या मानवतेच्या पुजाऱ्यास व त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा आणि प्रेरक चैतन्यदायी परमानंद दायी संवेदनशील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .
नैसर्गिक रक्ताच्या नात्यापलिकडे जात अडचणीच्या प्रसंगी रक्तपुरवठा करून नवे बंध निर्माण करणारी ‘रक्ताचे नाते ही संस्था यावर्षी २१ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. याचे औचित्य साधून; तसेच संस्थापक राम बांगड यांच्या ६१ वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ ऐतिहासिक सोहळ्यास शुभेच्छा
