ऑनरचा बेस्टसेलर ऑनर 7 एक्स आता मेड इन इंडिया

Share this News:

ऑनर या डिजिटल युगातील ग्राहकांसाठीच्या हुवेईच्या ईब्रँडने त्यांच्या ऑनर 7 एक्स या अत्याधुनिक ब्लॉकबस्टर उत्पादनाची निर्मिती आता भारतातील चेन्नई येथे सुरू केल्याची घोषणा आज केलीया उत्पादनाच्या निर्मितीसाठी चेन्नईतील श्रीपेरुंबुदूरच्या फ्लेक्स़ या स्केच टू स्केल  सोल्युशन पुरवठादार कंपनीशी ऑनरने भागीदारी केली आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये फ्लेक्स इंडिया या कंपनीशी भागीदारी करून हुवेई ऑनरने उत्पादनास सुरुवात केलीया ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत सर्वप्रथम होली 3 या फोनची निर्मिती करण्यात आलीत्यानंतरऑनर 6 एक्सच्या उत्पादनामुळे या उत्पादन साखळीला आणखी वाव मिळालाआताबाजारपेठेत नुकत्याच दाखल झालेल्या ऑनर 7 एक्स या स्मार्टफोनच्या माध्यमातून मेक इन इंडिया मोहिमेला आणखी गती प्राप्त होणार असून ऑनरने दिलेले प्रत्येक वचन आजवर चोख पाळले असल्याचीच ही ग्वाही आहे. भारतात सखोल गुंतवणूक करून गेल्या 18 वर्षांत कंपनीच्या प्रशिक्षणव्यापाराचे स्थानिकीकरण आणि विकासासाठी भारताला सर्वांत मोठे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणारी हुवेई ही टेलिकॉम क्षेत्रातली पहिलीच कंपनी आहेआपल्या भारतीय परिचालनात उत्पादन व संशोधनविकास केंद्राची स्थापना व त्यात गुंतवणूक करून ऑनरने आपले भारतातील स्थान अधिक बळकट केले आहेआपल्या व्यापारवृद्धीमध्ये ऑनर या ब्रॅण्डने संशोधनाला अधिक महत्व दिले असून ऑनर 7 एक्ससारख्या ग्राहकाभिमुख स्मार्टफोन्समध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली आहे.

‘‘भारतीयांची नवनवीन उत्पादनाची मागणी ऑनर आणि हुवेईकडून कायमच पूर्ण केली जाणार असून अत्याधुनिक उत्पादन आणि स्थानिकीकरणासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोतभारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हुवेईच्या उत्पादन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेलाही चालना देण्यात येत आहेतसेचदेशात हायटेक संशोधऩष़विकास तज्ज्ञता आणि ज्ञान आणण्याचाही यामागे विचार आहे.हुवेईच्या भारतातल्या 18 वर्षांच्या प्रवासात स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन हा एक मानाचा मापदंड असून बेस्टसेलर ऑनर 7 एक्सचे उत्पादन हीदेखील आमच्यासाठी एक विशेष क्रांती आहे,’’ असे हुवेई कन्झ्युमर बिझनेस ग्रुपच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष पीसंजीव म्हणाले.

किफायतशीर किमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा बजेट सेगमेंटमधला ऑनर 7 एक्स हा एक यशस्वी स्मार्टफोन आहेअत्यंत फॅन्सी डिस्प्ले असलेल्या या आकर्षक स्मार्टफोनचा स्क्रीन आणि बॉडी रेशोही सर्वाधिक असून याच्या स्लिक बॉडीमध्ये 5.9 इंची स्क्रीन सामावलेली आहेएखाद्या कॅमेर्यातून काढलेल्या छायाचित्रांप्रमाणेचया स्मार्टफोनमधूनही ग्राहकांना सुस्पष्ट दृश्यानुभव घेता येतोऑनर 7 एक्स डिव्हाईसमध्ये 16 एमपीचे ड्युएल लेन्स आणि 2 एमपीचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून याला फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅश हे फीचर्स जोडण्यात आले आहेतयातील विशेष फिल्टर्स आणि ‘इफेक्ट्स’ या फंक्शन्समुळे नवोदित छायाचित्रकारही उत्तम छायाचित्रांसह सोशल मिडिया गाजवू शकतोऑनर 7 एक्सला व्यावसायिक आय प्रोटेक्शन फीचर देण्यात आले असून याच्या अत्यंत स्टायलिश मेटल बॉडीमध्ये बरीचशी वैशिष्ट्ये सामावलेली आहेतयाच्या अॅल्युमिनीयम चॅसीजवर 2.5 डी ग्लास फेस बसवण्यात आला आहेकिरीन 659 ऑक्टाकोअर 2.36 गिगाहर्ट्झ प्रोसेसरचे सहाय्य लाभलेल्या ऑनर 7 एक्समध्ये लिथियमआयर्न 3340 बॅटरी देण्यात आली आहेयात 32 जीबी आणि 64 जीबी इंटर्नल मेमरीचे पर्याय उपलब्ध असून256 जीबीपर्यंत ही मेमरी स्टोअरेज वाढवता येतेयामुळे त्वरीत सेन्सरी रिस्पॉन्स मिळण्यास मदत होतेऑनर 7 एक्स हा स्मार्टफोन निळ्यासोनेरी आणि काळ्या रंगांत उपलब्ध असून हा फोन वापरणार्या ग्राहकांना अतिशय राजेशाही फील येतोयात शंका नाही.