साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सेवा दिंडी ट्रस्टच्या वारकऱ्यांचे स्वागत
पुणे :
साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सेवा दिंडी ट्रस्टच्या
वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने ऊस तोड कामगारांची ,१५० वारकऱ्यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था एस.एम. जोशी फाऊंडेशन मध्ये करण्यात आली. या उपक्रमाचे १९ वे वर्ष होते.
‘ साथी किशोर पवार प्रतिष्ठान ‘ चे विश्वस्त किरण ठाकूर,श्रीमती वंदना पवार, अॅड. संतोष म्हस्के, मंगल देडगे तसेच दिंडी प्रमुख ह.भ.प. रविंद्र तावरे उपस्थित होते.
