Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

सामाजिक कार्याबद्दल कुदळे यांचा सत्कार

राष्ट्रीय पातळीवरील राजीव गांधी उद्योगरत्न पुरस्कार विजेते उद्योजक अरुण कुदळे यांच्या एक्काहत्तरीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ऋणानुबंध, पुणेचे अध्यक्ष दीपक कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दशरथ कुळधरण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत आदी उपस्थित होते. सोमवारी (दि.25 डिसेंबर) सायंकाळी 5.30 वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, फातिमा नगर, हडपसर येथे हा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे अध्यक्षस्थानी राहणार असून ज्येष्ठ उद्योजक अरुण फोरोदिया आणि सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.