ज्युनिअर अँड युथ रेड क्रॉस पुणे जिल्हा मध्यवर्ती विभागातर्फेे तीनदिवसीय युवा नेतृत्व विकास व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

Junior and youth Red cross
Share this News:
पुणे प्रतिनिधी,
विशाल मुंदडा
पुणे : ज्युनिअर अँड युथ रेड क्रॉस पुणे जिल्हा मध्यवर्ती विभागातर्फेे दि. 20, 21 व 22 रोजी तीनदिवसीय युवा नेतृत्व विकास व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी अध्यात्मिक साधना केंद्र, मु. पो. उंबरे, (नसरापूरजवळ) ता. भोर या ठिकाणी केले आहे.
या कार्यशाळेत पुण्यातील 10 पेक्षा अधिक महाविद्यालयातील 100 हुन अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत मुलांना आपतकालीन परिस्थिती कशी हाताळावी तसेच तातडीच्या वेळी प्रथमोपचार कसा करावा याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
आर व्ही कुलकर्णी यांनी आपत्ती व्यवस्थापन, सचिन परदेशी यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी चा इतिहास व प्रथमोपचार, विनोद निकंबे यांनी करिअर गाईडन्स, रुपाली तोडमल यांनी एचआयव्ही-एड्स माहिती, डाँ डी बी परदेशी यांनी  संवाद कौशल्य यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या मुलांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
त्याचप्रमाणे ग्रामीण जनजीवनाचा त्यांना अभ्यास करता यावा यासाठी उंबरे गावातून त्यांची प्रभात फेरी काढण्यात आली व त्या गावात मुलांनी जणजागृतीपर पथनाट्य सादर करून शेवटी स्वच्छता मोहिमही राबवली.
या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे काम सुरळीत चालावे यासाठी विद्यासागर सोनवणे, अश्विनी नाईक, विशाल गायकवाड, चैतन्य शेलार, सेजल दलाल, शुभम खुटवड, सिद्धांत बनसोडे, किरण क्षीरसागर या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.