मोबाईल ॲप्समुळे महावितरणचे कामकाज अधिक गतीशील, 10 लाख ग्राहकांकडून वापर
मुंबई, दि. 13 फेब्रुवारी 2017 :- राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळावी यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीनेतयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यात सुमारे 10 लाखग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲपद्वारे आतापर्यन्त 1 कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यातआले आहे. तसेच 7 लाख 43 हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या ॲपचा वापर केलाअसून सुमारे 45 हजार 813 ग्राहकांना ॲपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
या ॲपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आलेनाही त्यांना ॲपद्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप महावितरणवेबसाईट, गुगल प्ले, ॲपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.
राज्यातील सुमारे 38 हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र ॲप” डाऊनलोड केले असूनयाद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचुक वीजमीटर रिडींग, फिडर व डीटीसी मीटररिडींग इत्यादी दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात अधिक गती आलीआहे.
महावितरणच्या सुमारे 1 कोटी 4 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोदणी महावितरणकडे केली असूनया ग्राहकांना मीटर रीडिंग, वीजबिल, ऑनलाईन बिल, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटरवाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचनामहावितरणतर्फे एसएम्एसद्वारे पाठविण्यात येत आहेत.