विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Saurabh Rao
Share this News:

पुणे,दि, 1/9/2020 :- पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 70 हजार 314 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 697 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.86 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 997 रुग्णांपैकी 7 हजार 592 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 397 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 164 रुग्णांपैकी 13 हजार 563 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 859 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 778 रुग्णांपैकी 6 हजार 338 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 975 आहे. कोरोनाबाधित एकूण 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 683 रुग्णांपैकी 14 हजार 49 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 911 आहे. कोरोनाबाधित एकूण 723 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 82 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 933, सातारा जिल्ह्यात 489, सोलापूर जिल्ह्यात 363, सांगली जिल्ह्यात 686 तर कोल्हापूर जिल्ह्यात 611 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 86 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 37 हजार 936 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.