माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या
पुणे महानगरच्यावतीने जाहीर निदर्शने
माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे महानगरच्यावतीने पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व चौकात जाहीर निदर्शने केली .
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , माजी खासदार समीर भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे , सरकारने अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य नाही , दुष्काळ परिस्थिती , शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी , थांबलेला विकासदर अशा प्रकारच्या अपयशावर पाघरून घालण्यासाठी हे सरकार राजकीय द्वेषातून व सरकारी यंत्रणेचा मनमानी दूरपयोग करून भुजबळ कुटुंबियांवर कारवाई करत आहे . प्रत्यक्षात छगन भुजबळ आणि कुटुंबीय तपासात सहकारू करत असताना त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रतिमेला बदनाम करण्यासाठी खोटी कारवाई केली जात आहे त्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे महानगरच्यावतीने या सरकारचा निषेध करीत आहे . अशा प्रकारची कारवाई त्वरित थांबविण्यात यावी नाहीत राज्यभर तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येतील असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे महानगरचे अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी दिला .
या निदर्शनामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे महानगरचे अध्यक्ष प्रितेश गवळी , गणेश कळमकर , शिवराम जांभुळकर , रामदास भुजबळ , श्रीरंग होले , बंडू कचरे , रमेश माळी , धनुसेठ झुरुंगे , अड. चंद्रशेखर भुजबळ , सागर दरवडे , दिलीप भुजबळ , अविनाश चौरे , प्रदीप बनसोडे , विशाल नेवसे , पुंडलिक लव्हे , निलेश ससाणे , हनुमंत टिळेकर , केतन राउत , भरत कळमकर , प्रमोद कळमकर , अतुल वाघ , हेमंत कळमकर , राजू कळमकर , लखन कळमकर , पंढरीनाथ बनकर आदी पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.