हिंजवडी इंडस्ट्रियल असोसीयशनच्यावतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी

पुणे दि.28: हिंजवडी इंडस्ट्रियल असोसियशनच्या वतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 , आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्यकडे पाच लाख रूपयांचे 850 धन्य किट देण्यात आले.
विभागीय आयुक्त् कार्यालयात धनादेश प्रधान करतेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.