5000 CNG two-wheelers will be launched by MNGL

MNGL CNG bike press conference

Share this News:

५ हजार सीएनजी दुचाकी अनावरण सोहळा शुक्रवारी
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांची उपस्थिती

पुणे : पुण्यातील ५ हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी, दुपारी ३.३० वाजता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्घाटन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी , आॅपरेशन आणि देखभाल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक मिलिंद नरहरशेट्टीवार, विपणन महाव्यवस्थापक मिलिंद ढकोले, मयुरेश गानू, माणिक कदम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे म्हणाले, दुचाकींना बसविण्यात येणाºया सीएनजी कीटची किंमत १५ हजार ५०० रुपये आहे. यातील बँक आॅफ महाराष्ट्र १२ हजार रुपये वित्तपुरवठा करणार आहे. कर्ज घेऊन हे कीट बसविणाºया पहिल्या ५ हजार नागरिकांचे व्याज एमएनजीएल भरणार आहे. पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण या सर्वाला सीएनजी हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी आपल्या दुचाकींना सीएनजी कीट बसवून घ्यावे,असे आवाहन देखील त्यांनी केले.
संतोष सोनटक्के म्हणाले, सीएनजी दुचाकी अनावरण सोहळ््यासाठी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, आमदार विजय काळे, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी.सी. त्रिपाठी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक डी. राजकुमार, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अध्यक्ष वंदना चानना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*मोफत पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणी – ५० पेक्षा अधिक घरे असणाºया सोसायटीत मोफत पीएनजी गॅस जोडणी केली जाणार आहे. सोसायटीतील ९० % ग्राहकांनी ५०० रुपये भरुन नोंदणी केल्यास २ टप्प्यात ते पैसे परत दिले जाणार आहेत. यामध्ये नोंदणी केल्यानंतर २० % रक्कम आणि जोडणी पूर्ण झाल्यानंतर ८०% रक्कम अशा स्वरुपात परतावा दिला जाणार आहे.