JNU महाविद्यालयात भारत विरोधी घोषणाबाजी केल्याने पुण्यातील अभियांत्रिकी विद्यार्थांचे निषेध प्रदर्शन

काही दिवसापूर्वी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही वामपंथी व फुटीरतावादी विचाराच्या विद्यार्थ्यांकडून भारत विरोधी घोषणा देण्यात आल्या. भारताच्या संसदेवर हल्ला करणारा आतंकवादी अफजल गुरु व पाकिस्तानचे समर्थन करत उदो उदो करण्यात आला. आझाद काश्मीरचा सूर आवळण्यात आला. हा सर्व प्रकार देशाच्या राजधानीत चालू होता. भारताच्या भूमीवर भारताच्याच अखंडतेवर घाला घालण्याचा प्रयत्न म्हणजे अक्षम्य अपराध आहे, देशद्रोह आहे.
या देशद्रोही तत्त्वांचा तीव्र निषेध करण्यासाठी दि.१५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सायंकाळी ४ वाजतापुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये “पुणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यां”कडून तीव्र निषेध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी JNU छत्र संघावर व AISA संघटनेवर बंदी घालावी हि मागणी करण्यात आली. तसेच देशद्रोही विद्यार्थ्यांची चौकशी करून दोषींना कडक शासन करावी हि मागणी करण्यात आली.
हे निषेध प्रदर्शन मॉडर्न अभियांत्रिकीचे प्राध्यापक कौस्तुभ कापडणी व विद्यार्थी भरत पाटील, विक्रम सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, सुमित शाह, प्रसाद ताथवडेकर यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले. तसेच गरवारे सायन्स महाविद्यालय, G H रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय (वाघोली), मॉडर्न सायन्स महाविद्यालय(गणेश खिंड), मॉडर्न MBA(शिवाजीनगर), पुणे विद्यापीठ व इतर वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुण मोठ्याप्रमाणात सहभागी होते.