गणेश पांडे याच्या सह विनोद तावडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा.- नवाब मलिक

Share this News:

मुंबई – दि.28 : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या एका युवती पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी गणेश पांडेवर व त्याने  उल्लेख केल्याप्रमाणे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर देखील  तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

   यावेळी ते म्हणाले  भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे 4 ते 6 मार्च रोजी मथुरा येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरासाठी मुंबईतून युवा मोर्चाचे कार्यकर्ते मथुरेला गेले होते. त्याठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या एका युवतीचा युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांने विनयभंग केला, याबाबत संबधीत युवतीने एका पत्राव्दारे या प्रकाराला वाचा फोडली आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे तिच्या रुमबाहेर  मोठ्या आवाजात अश्लिल चित्रफीत गणेश पांडेने यांने सुरु केली होती.नंतर त्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला , या युवतीने मुंबई भाजपा अध्यक्षाकडे या प्रकाराची तक्रार केली होती. अध्यक्षांची जबाबदारी होती की गणेश पांडे याच्या विरुध्द ‘एफआयआर’ दाखल करुन त्यांना अटक करुन देण्याची आवश्यक होते . परंतु त्यांनीच हा सर्व प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार पुढे आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली,  यापत्रात संबधीत युवतीने उल्लेख केल्याप्रमाणे पांडेच्या म्हणण्यानुसार “तावडेंनी तुला सोडले पण मी तुला सोडणार नाही”, याचा अर्थ अटेम्प्ट टू रेप पांडेनी पण केला ,  आणि तावडेंनी पण यापुर्वी तसा प्रयत्न केला असेल असा गणेश पांडेचा दावा  आहे.
त्यामुळे मुंबई पोलीसांनी तात्काळ  तावडे,व  पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, आवश्यक वाटल्यास मथुरा कोर्टाकडे सोपविली जावी