नांदेडच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी

Share this News:

सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा-धनंजय मुंडे

मुंबई दि.28……………….सलग 2 वर्षापासुनचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्यामुळे नैराश्यातुन मंत्रालयासमोर विष पिवुन आत्महत्या करणाऱ्या नांदेड येथील शेतकऱ्याच्या मृत्युला सरकारच जबाबदार असुन या सरकारवरच 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मागणी विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली.

आज कामकाज सुरु होताच नियम 289 अन्वये त्यांनी नांदेड जिल्ह्यातील जानापुरी येथील माधव कदम या शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. या शेतकऱ्याला वेळेवर अनुदान मिळाले असते, कापसाला अनुदानातुन वगळले नसते तर हि घटना टळली असती असे मुंडे म्हणाले.फेसबुक आणि ट्विटर वरुन काम करणाऱ्या सरकारला शेतकऱ्याने आपल्या वेदना फेसबुकद्वारे व्यक्त करुनही सरकार पर्यंत त्या पोहचु शकल्या नाहीत. याचा खेद व्यक्त करुन औरंगाबादच्या शिवसेनेच्या आमदाराच्या पी.ए. ला जमीन नसतानाही सव्वा लाख रुपयांचे अनुदान मिळते,शेतकऱ्यांना मात्र त्यासाठी आत्महत्या करावी लागते याची सरकारला लाज वाटत नाही का ? असा घनाघातही त्यांनी लगावला.

जय-भीम च्या घोषणा देतो; गुन्हा दाखल करुन दाखवा

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात जयभीम म्हणणारे जर देशद्रोही असतील तर, मी एकदा नाहीशंभर वेळा जयभीमची घोषणा देतो तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करुन दाखवा अशा शब्दात धनंजयमुंडे यांनी आज सरकारला आव्हान दिले. सभागृहात पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातजयभीमच्या घोषणा दिल्या म्हणुन दाखल करण्यात आलेले गुन्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनाझालेली मारहाण हा मुद्दा ही त्यांनी उपस्थित करुन सरकार दादागिरीचे राजकारण करत असल्याचाआरोप केला.